होत राहतील कैक इलेक्शन, कशाला घेता मरणाचं 'टेन्शन?'; तज्ज्ञांचा राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला

नेते आणि कार्यकर्ते निवडणूक काळात प्रचंड तणावाला सामोरे जात असतात.
Political leaders Exercise and Meditate
Political leaders Exercise and Meditateesakal
Summary

नेता कितीही मोठा असला, तरी त्याचे शरीर सामान्य माणसासारखेच असते. राजकारणात गुप्ततेच्या नावाखाली डोक्यात ओझे साठवून ठेवू नका.

सांगली : सन २०२४ हे वर्ष कशासाठी खास असेल, तर यावर्षी होणारी लोकसभा निवडणूक (LokSabha Election), विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक... नुसता धुरळा उडेल. या काळात नेत्यांची परीक्षा असेलच, शिवाय कार्यकर्त्यांचीही धावपळ होईल. हा काळ तणावाचा, धकाधकीचा असतो. ते टाळायचे असेल आणि जीवघेणा प्रसंग येऊ नये, याची खबरदारी घ्यायची असेल तर नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यायाम आणि मेडिटेशन करत राहावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Political leaders Exercise and Meditate
Success Story : ..अखेर स्वप्न झालं पूर्ण! संसाराचा गाडा सांभाळत कष्टातून शीतल पाटलांची उपनिरीक्षकपदाला गवसणी

आमदार अनिल बाबर (Anil Babar) सध्या सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. ते कितीही धावपळीत असू देत, घरचाच डबा जेवतात. आमदार जयंत पाटील (Jayant Patil) राज्यभर दौरा करत असताना ड्रायफ्रूट, मेथीची भाजी व चपाती, ताक असा आहार घेतात. खासदार संजय पाटील नित्यनेमाने व्यायाम करतात. कोरोना काळात त्यांनी केलेल्या शारीरिक कसरती लक्षवेधी ठरल्या होत्या.

हे सगळे खरे असले, तरी नेते आणि कार्यकर्ते निवडणूक काळात प्रचंड तणावाला सामोरे जात असतात. हे वर्ष तर अधिकच धकाधकीचे आणि एकामागून एक निवडणुकीचे असणार आहे. या परीक्षेच्या काळात शारीरिक आणि मानसिक संतुलन महत्त्वाचे ठरेल. निवडणुकीतील मतांच्या बेरजेइतकेच हे महत्त्वाचे मानले तर राजकारण आणि जीवन याचा बॅलन्स साधला जाईल, असे तज्ज्ञ सांगतात.

Political leaders Exercise and Meditate
जयश्रीताईंनी अजितदादांची भेट घेताच जयंत पाटलांनी गाठला मदनभाऊंचा बंगला; राजकीय चर्चांना आलं उधाण

शिर सलामत तो पगडी पचास, हे लक्षात ठेवा. स्वतः शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त राहा. त्यासाठी डोके शांत ठेवा. काहीही झाले तरी मी स्थिर राहणार, हे निश्‍चित ठरवा. किती हवा, वादळ आले तरी मन स्थिर राहिले पाहिजे. त्यासाठी शरीराचे नियम पाळायला हवेत. वेळच्या वेळी जेवण करणे त्यात खूप महत्त्वाचे. वेळेत विश्रांती घ्यावी.

सभा, बैठका रात्री उशिरा चालू राहतील, मात्र ते कायम सवयीचे नको. ते अंगाशी येऊ शकते. वेळेवर खाताना काय खातोय, हेही पाहायला हवे. मिळेल तेथे मिळेल ते खाऊ नये. चाळिशी ओलांडली आहे, अशांनी त्याची खूप काळजी घ्यावी. सात्विक, घरातील जेवण करा. डबा बंद, हवा बंद खाद्ये पूर्ण बंद करा. इन्स्टंट फूड घेऊ नका. जी औषधे सुरू आहेत, ती अजिबात चुकवू नका. रक्तदाब, हृदयाचा त्रास असेल तर गाफील राहू नका. सतत सकारात्मक विचार हे सगळ्यात महत्त्वाचे आहेच.

- डॉ. अनिल मडके, छातीरोगतज्ज्ञ

Political leaders Exercise and Meditate
जिद्दीच्या बळावर अन् चिकाटीच्या जोरावर वेटर, शेतमजुराचा मुलगा बनला 'फौजदार'; पोलिस उपनिरीक्षकपदाला घातली गवसणी

कुठलीच निवडणूक फायनल नसते. आजवर हजारो निवडणुका झाल्या, लाखो लोक जिंकले आणि त्याच्या कित्येक पटीने पराभूत झाले. हे चालत आले आहे. त्यावर तुम्ही तुमची लायकी ठरवू नका. जसे खेळाकडे पाहतो, तिथे हार-जित समान असते. जिंकलो तरी कोणी महान होत नाही आणि हरले तरी बेकार ठरत नाही, असा संदेश गीतेतही दिला आहे. या सगळ्याकडे समान बुद्धीने बघायला हवे. कुठलीच निवडणूक जीवन-मरणाचा प्रश्‍न करू नये. हे साध्य होते, मात्र त्यासाठी रोजच्या जगण्यात बदल करायला हवा. मेडिटेशन व व्यायाम करायला हवा. त्याने तणाव कमी होतो. नेता कितीही मोठा असला, तरी त्याचे शरीर सामान्य माणसासारखेच असते. राजकारणात गुप्ततेच्या नावाखाली डोक्यात ओझे साठवून ठेवू नका.

-डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचारतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com