
कुडची येथील फारुक पिरजादे उर्फ बाबा हा बनावट नोटा तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. तो बनावट नोटा खपविण्यासाठी परशुराम नाईक व जलाल दरुरवाले (दोघेही रा. कुडची) यांच्याकडे देत होता. त्या नोटा बाजारात आणत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती.
रायबाग ( बेळगाव ) - कुडची येथे बनावट नोटा तयार करून त्या बाजारात खपविणाऱ्या टोळीचा बेळगावच्या डीसीआयबी व स्थानिक पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांच्याकडून 2 लाख 33 हजाराच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई गुरूवारी (ता. 14) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी परशुराम नाईक व जलाल दरुरवाले (दोघेही रा. कुडची) यांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपी फारूक पिरजादे हा फरार आहे.
कणकवली पोलिस ठाण्याच्या आवारातच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
याबाबत माहिती अशी, कुडची येथील फारुक पिरजादे उर्फ बाबा हा बनावट नोटा तयार करण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. तो बनावट नोटा खपविण्यासाठी परशुराम नाईक व जलाल दरुरवाले (दोघेही रा. कुडची) यांच्याकडे देत होता. त्या नोटा बाजारात आणत असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी (ता. 14) परशुराम नाईक व जलाल दरुरवाले बनावट नोटा घेऊन महालिंगपूरकडे जात असल्याचीही माहिती मिळाल्याने जमखंडी रस्त्यावरील 3 किलो मीटर अंतरावर या दोघांना चौकशीसाठी थांबविले.
किरकोळ वादातून सांगली येथे महाविद्यालयीन तरुणाचा खून
पानटपरीतून नोटा चलनात
अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट नोटा मिळाल्या. आरोपींना घेऊन ज्या ठिकाणी नोटा तयार केल्या जात होत्या, त्या ठिकाणी पोलिसांनी नेऊन पाहणी केली. तेथे 100, 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. तर काही नोटांची एका बाजूला छपाई केल्याचे पोलिसांना आढळले. मुख्य सूत्रधार फारुक पिरजादे हा पोलिसांना चकवा देऊन फरारी झाला आहे. या बनावट नोटा महालिंगपूर, बनहट्टी, जमखंडी, रायबाग, हारुगेरी येथे फळ विक्रेत्यांसह पानटपरीत चलनात आणल्या जात होत्या.
डीसीआयबीचे निरीक्षक निंगनगौडा पाटील, कुडचीचे पोलिस उपनिरीक्षक जी. एस. उप्पार, आर. व्ही. पट्टणशेट्टी, एल. बी. गदाड, एल. टी. पवार, टी. के. कोलची, एम. आय. मुजावर, एस. एस. मग्गेण्णावर, एस. आय. पठाण, डी. एस. साळुंखे, के. आर. साळुंखे, जी. एच. होनवाड, एस. व्ही. हंजी, पी. ए. गडेकर यांनी ही कारवाई केली.