कोल्हापूर : नगरसेवक नियाज खान यांच्यावर गुन्हा दाखल

कोल्हापूर : नगरसेवक नियाज खान यांच्यावर गुन्हा दाखल

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील "बी' वॉर्ड आरोग्य विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करून टाळे लावल्याप्रकरणी नगरसेवक नियाज खान यांच्यासह कार्यकर्त्यांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद राहुल शरद राजगोळकर (वय 29) यांनी दिली. 

नगरसेवक नियाज असिफ खान (रा. जवाहरनगर), सौरभ पाटील (रा. जाधव पार्क, रामानंदनगर), रविकिरण गवळी (रा. नेहरूनगर) आणि शिवसेनेचे 10 ते 15 अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मंगळवार पेठेतील महाराणी ताराबाई विद्यालयात आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. येथे जवाहरनगर, शास्त्रीनगर प्रभागातील आरोग्य निरीक्षक, मुकादम, कर्मचारी काम करतात. येथे राहुल राजगोळकर हे काम करतात.

काल दुपारी जवाहरनगर, शास्त्रीनगर प्रभागात आरोग्य कर्मचारी उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून नगरसेवक नियाज खान हे कार्यकर्त्यांसह कार्यालयात गेले. त्यांनी कर्मचारी कामावर हजर नाहीत, बायोमॅट्रीक हजेरी मशिन का बंद आहे आदींचा जाब विचारण्यास सुरवात केली. त्याचवेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्या सर्वांनी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करून कार्यालयातील फोन, वायफाय कनेक्‍शनची तोडफोड केली.

कार्यालयातील काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्याचबरोबर कर्मचारी काम करत असताना कार्यालयाला बाहेरून कुलूप लावून कोंडून ठेवले अशी फिर्याद राहूल राजगोळकर यांनी दिली. त्यानुसार संशयित नगरसेवक नियाज खानसह सौरभ पाटील, रविकिरण गवळीसह 10 ते 15 कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला.

सदरचा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी काही नगरसेवकांची दिवसभर धडपड सुरू होती. गुन्हा दाखल झाला तरी त्याची व्याचता होऊ नये यासाठीचेही त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com