कोल्हापूर (Kolhapur) : जिल्ह्यातील आदमापूर येथे आज (शनिवार) मतमोजणीच्या दिवशीच गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे..Kolhapur School Incident: शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू! कोल्हापुरात घडली हृदयद्रावक घटना.मिळालेल्या माहितीनुसार, आदमापूर येथे गोळीबाराची घटना घडली आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून फिर्यादी आणि आरोपी यांच्यात एकमेकांवर गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. फिर्यादी विनायक सुकुमार लाड उर्फ कोळी आणि आरोपी अनिकेत कांबळे यांनी एकमेकांवर गोळीबार केला. गोळीबारात कोणीही जखमी झालेले असनू, यावरून आदमापुरात तणाव निर्माण झाला आहे. .Mahesh Landge won Bhosari Assembly Election 2024: भोसरीत महेश लांडगे यांची विजयाची हॅट्रिक; अजित गव्हाणे यांना दिला धोबीपछाड.गोळीबार करणारा विनायक लाड याला भुदरगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच बंदुकही जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची शक्यता आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.