सोलापूर जिल्ह्यातून जाणार पाच हजार कार्यकर्ते 

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 21 January 2020

माती परिक्षणासाठी प्रयोग शाळा सुरू करणार 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी जमिनीचे आरोग्य तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी माती परीक्षणाची प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. माती परीक्षण प्रयोगशाळेचा प्रारंभ लातूर येथे राज ठाकरे यांच्या हस्ते लवकरच होणार आहे, अशी माहिती दिलीप धोत्रे यांनी यावेळी दिली. राज्यातील सुमारे 353 ठिकाणी अशा माती परीक्षण प्रयोग शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. माती परीक्षणासाठी लागणारी सर्व यंत्रणा संबंधित तालुक्‍याच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. लवकरच मनसेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या शेतात माती परीक्षणासाठी जाणार आहेत. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : मुंबई येथे 23जानेवारी रोजी होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिवेशनाला सोलापूर जिल्ह्यातून सुमारे पाच हजार पाचशे कार्यकर्ते उद्या (ता. 22) मुंबईला जाणार आहेत. कार्यकर्त्यांना जाण्यासाठी खासगी बसगाड्यांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती मनसेच्या सहकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

हेही वाचा - बारावीच्या परिक्षेवर बहिष्कार, गुरूवारी परिक्षा मंडळावर मोर्चा 

श्री. धोत्रे म्हणाले की, राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेला 23 जानेवारी रोजी 13 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पक्षाच्या वाटचालीचे सिंहावलोकन करण्यासाठी मुंबईत अधिवेशन भरविण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातून लाखो मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते अधिवेशनाला जाणार आहेत. 

हेही वाचा - मराठा सेवा पतसंस्थेत चाललंय तरी काय? 

दोन दिवसांपासून जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते अधिवेशनाची तयारी करत आहेत. प्रत्येक तालुक्‍यातून किमान पाचशे कार्यकर्ते जाणार आहेत. जिल्ह्यातून सुमारे पाच हजाराहून अधिक कार्यकर्ते उद्या मुंबईकडे रवाना होणार आहेत. प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणाहून कार्यकर्त्यांसाठी खासगी बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याचेही श्री. धोत्रे यांनी सांगितले. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, अनिल बागल, सिद्धेश्वर गरड, श्री. मासाळ आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand activists will pass through Solapur district for mns convention