esakal | ट्रम्प यांच्या स्वागताला आरेवाडीतील गजनृत्य
sakal

बोलून बातमी शोधा

a folk dance group from Arewadi of Sangali involved in welcome program to donald trump

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांध्ये आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील प्रख्यात गजनृत्याचा समावेश होता. या नृत्याने जागतिक नेत्याचे लक्ष वेधून घेतले. 

ट्रम्प यांच्या स्वागताला आरेवाडीतील गजनृत्य

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ढालगाव ः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारत भेटीवर आले. ही झाली ग्लोबल म्हणजे जागतिक न्यूज... पण, सांगलीकरांसाठी या ग्लोबलमध्ये एक लोकल अभिमानास्पद बातमी दडली आहे. ती म्हणजे ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांध्ये आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील प्रख्यात गजनृत्याचा समावेश होता. या नृत्याने जागतिक नेत्याचे लक्ष वेधून घेतले. 

आरेवाडी येथील श्री बिरोबा गजनृत्य वालूघ मंडळाच्या गजनृत्याने अहमदाबाद (गुजरात) येथे भाव खाल्ला. अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचे उद्‌घाटन ट्रम्प यांच्या हस्ते झाले. त्याआधी त्यांच्या स्वागतासाठी राज्यभरातून दहा विविध कलाकारांच्या पथकांची निवड केली होती.

यात कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या आरेवाडी गावातील श्री बिरोबा गजनृत्य वालूघ मंडळाच्या पथकाची निवड केली होती. कलाकारांच्या पथकात सात जणांनी निवड करण्यात आली होती.

पथकाचे प्रमूख अनिल कोळेकर आहेत. यामध्ये रघुनाथ भीमराव कोळेकर, केरू कोळेकर, तुळशीराम कोळेकर, काशिलिंग तुकाराम कोळेकर, समाधान दाजी कोळेकर आणि दुर्योधन विलास पाटील यांचा समावेश होता. श्री बिरोबा गजनृत्य वालूघ मंडळ 22 फेब्रुवारीला आरेवाडी येथून कार्यक्रमासाठी रवाना झाले होते. आज अहमदाबाद येथे कार्यक्रम झाल्यानंतर तेही भारावून गेले होते.