"महात्मा फुले' योजनेत पुन्हा लुट; आरोग्य मित्रांची भूमिका शंकास्पद  

शिवाजी यादव
बुधवार, 8 जानेवारी 2020

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्य शासनाने 971 आजारांवर मोफत उपचारांची सुविधा दिली आहे. अशी योजना शासकीय रूग्णालयांबरोबर खासगी रूग्णालयातून चांगल्या प्रकारे चालविली जाते. मात्र, काही मोजक्‍या सात-आठ रूग्णालयांकडून योजनेचा तसेच व रूग्णांकडून पैसे असा दुहेरी लाभ घेतला जात आहे. काही आरोग्य मित्रांचे डॉक्‍टरांशी असलेल्या हितसंबधातून असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोल्हापूर  ः महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्य शासनाने 971 आजारांवर मोफत उपचारांची सुविधा दिली आहे. अशी योजना शासकीय रूग्णालयांबरोबर खासगी रूग्णालयातून चांगल्या प्रकारे चालविली जाते. मात्र, काही मोजक्‍या सात-आठ रूग्णालयांकडून योजनेचा तसेच व रूग्णांकडून पैसे असा दुहेरी लाभ घेतला जात आहे. काही आरोग्य मित्रांचे डॉक्‍टरांशी असलेल्या हितसंबधातून असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा -  काँग्रेसच्या नेत्याकडून येथे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार 

अशा प्रकारे फसवणूक होणाऱ्या रूग्णांना योजनेच्या समन्वकांकडे तक्रार करता येते. याबाबतची माहिती आरोग्य मित्रांकडून देणे टाळले जात असल्याने अनेकांना याची माहितीच नसल्याने लुटीला सर्वसामान्य बळी पडत आहेत.

"महात्मा फुले जीवनदायी योजना' सुरू होऊन जवळपास सात वर्षे झाली. ही योजना ज्या रूग्णालयात आहे, तिथे योजनेची माहिती देणे व कागदोपत्री प्रक्रिया करण्यासाठी आरोग्य मित्रांची नियुक्ती आहे. त्यांच्याकडे रेशन कार्ड व आधार कार्ड देऊन रूग्णालयात दाखल झाल्यानंतर रूग्णांची तपासणी होते, रूग्ण लक्षणे त्यावर करावे लागणारे उपचार व खर्चाचे तपशील याची माहिती ऑनलाईनद्वारे योजनेच्या मुंबईतील मुख्यालयात दिली जाते. तिथून पुढे उपचारासाठी होकार आल्यानंतर उपचार होतात. रूग्ण बरा होऊन घरी जातो त्या रूग्णाचे बिल योजनेद्वारे संबधीत रूग्णालयाला दिली जाते, असे या योजनेचे स्वरूप आहे.

हे पण वाचा -  सिधुदुर्गात पर्यटनासाठी जाणार आहात, मग हे जरूर वाचा... 

यात शहरातील एका "आड'वाटेवर असलेल्या रूग्णालयात हृदयरोगाच्या उपचारासाठी गेला की, दोन दिवस दाखल करून घेतले जाते. त्यानंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी उपचार सुरू होतात. सात-आठ दिवस उपचार झाले की, डिस्चार्ज घेते वेळी पहिल्या दोन दिवसांचे बिल रूग्णांकडे मागितले जाते. काहीवेळा आजार योजनेत बसत नव्हता तरीही बसविला असेही सांगितले जाते. वास्तविक रूग्णाचा आजाराचा योजनेत समावेश होईल की नाही हे लक्षणे व यादीवरून सुरवातीला सांगणेच टाळले जाते. आरोग्य मित्र या योजनेची वरवर माहिती देतात. त्यात काही शंका विचारल्यास खेकसतातही, परिणामी रूग्ण व त्यांच्या नातेवाईंकाचा संभ्रम वाढतो. तेव्हा डॉक्‍टर योजनेत समाविष्ट झालेल्या रूग्णाकडूनही पहिल्या दोन दिवसांचे बिले मागतात. हृदय रोग व किडणी विकाराच्या रूग्णानांनी थोड्याफारकाने असा अनुभव घेतल्याचे सांगण्यात येते.

हे पण वाचा - सावधान ; कोल्हापुरातील तरूण अडकलेत या जाळ्यात 

गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी योजनेच्या मुख्यालयातून आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही रूग्णालयांची तपासणी केली. यात रूग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या रूग्णालयांना योजनेतून निलंबीतही केले होते. त्यानंतर हा प्रकार काहीसा थांबला होता. मात्र, गेल्या दोन महिन्या पासूनवरील प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. वास्तविक रूग्णांना मदत न करणाऱ्या आरोग्य मित्रांची भूमिका संशयांची आहे. यात काही आरोग्य मित्र राधानगरीतील एका आमदाराचे नाव सांगून रूग्णावर वरिष्ठांवर अरेरावी करत असल्याचेही सांगण्यात येते.

हे पण वाचा - कामवाल्या बाईला बेडरूममध्ये बोलविले आणि....  

तक्रारी जिल्हा समन्वयांकडे द्याव्यात
जिल्ह्यात 31 रूग्णालयात "महात्मा फुले जीवनदायी' योजना सुरू आहे. योजनेत ज्या रूग्णांच्या तक्रारी येतात, त्याची दखल घेऊन चौकशी केली जाते. त्यानुसार संबधीत रूग्णालय व आरोग्य मित्रांनाही सुचना केल्या जातात तरीही ज्यांच्या तक्रारीचे निरसन होत नसल्यास संबधीतांनी आपल्या तक्रारी जिल्हा समन्वयांकडे द्याव्यात त्याची दखल घेतली जाईल.
- डॉ. सुभाष नांगरे, जिल्हा समन्वयक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in Mahatma Fule Jivandayini Scheme