Sangli Ganesh Visarjan 2022
Sangli Ganesh Visarjan 2022

Ganesh Visarjan 2022 : आवाजाची मर्यादा पाळा...

पोलिस प्रमुखांकडून आवाहन

मिरज : राज्य सरकारकडून दिलेल्या आदेशानुसार यंदा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका निर्बंधमुक्त होणार असल्याचे स्पष्ट करतानाच ‘आवाजाची मर्यादा पाळा’ असे आवाहन पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केले आहे. ते शहरातील अनंत चतुर्दशीनिमित्त निघणाऱ्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यातील बंदोबस्तांच्या आढावा बैठकीनंतर होते. अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, उपाधीक्षक अशोक वीरकर, पोलिस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, राजेंद्र सावंत्रे उपस्थित होते.

अधीक्षक गेडाम म्हणाले, ‘‘यंदा तीन वर्षांनंतर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला. अनंत चतुर्दशीदिवशी २५० हून अधिक मंडळांकडून गणरायांना निरोप दिला जाणार आहे. विसर्जन सोहळा मोठा होईल. मिरवणुका निघतील. कायदा व सुव्यवस्थेसाठी १ हजार १०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मिरज शहरात ३०० जणांवर चार दिवस शहरात मनाई आदेश आहेत. पोलिसांकडून उत्सवादरम्यान गर्दीवर नियंत्रण, वाहतूक कोंडी, गुन्हेगारांना आळा, गणेशदर्शन चांगल्या पद्धतीने पार पडण्यासाठी बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. महिलांसाठी विशेष पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एलसीबी, पोलिस गोपनीय पथक यांचे मिरवणुकीवर बारकाईने लक्ष असेल.’’

मिरवणुकीवर लक्ष...

शहरात २० सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल कॅमेरे, ड्रोन पेट्रोलिंग कॅमेरा, टेहळणी टॉवर स्टॅंडद्वारा मिरजेतील मिरवणुकांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

दागिने टाळाच ः

तीन वर्षांनंतर होत असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दी पाहता नागरिकांनी दागिने मिरवणुकीदरम्यान वापरणे टाळावे.

...असा आहे बंदोबस्त

  • पोलिस उपाधीक्षक ३

  • वरिष्ठ पोलिस निरीक्षक १४

  • सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक ६७

  • पोलिस कर्मचारी ५३५, वाहतूक पोलिस ६७

  • होमगार्ड १००, एसआरपी कंपनी १

  • आरसीपी ४, निवृत्त पोलिस कर्मचारी ३०

पार्किंग व्यवस्था

मिरज हायस्कूल न्यू इंग्लिश स्कूल आयडियल स्कूल, महात्मा फुले चौक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com