आठ वर्षाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; चार नराधमांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

पोलिसांनी संशियांवर अपहरणसह "पोक्‍सो' अंतर्गत गुन्हे नोंदविले आहेत. या प्रकरणातील चारपैकी तीन संशयित हे पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. दोन जबरी चोरीचे गुन्हे शिवाजीनगर व गावभाग पोलिसांत दाखल आहेत.

इचलकरंजी - आठवर्षीय मुलीचे अपहरण करुन सामुहिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार येथे घडला. या प्रकरणातील चारही नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील तिघेजण पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. शहरातील सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. 

या घटनेचे शहरात तीव्र प्रतिक्रीया उमटली असून, संशयितांना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. विविध संस्थांच्या शिष्टमंडळाने याबाबत अपर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांना निवेदन दिले. 

रोहित गजानन जाधव, सौरभ मकरध्वज माने, शुभम नितीन गोखले, शाकिब अब्दुल शेख (सर्व राहणार जयभिमनगर) यांना याप्रकरणी अटक केली आहे. सर्व संशयित 19 ते 20 वयोगटातील आहेत. याबाबतची माहिती पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांनी दिली. 

या प्रकरणातील पिडीत मुलीवर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीच्या वडीलांनी याबाबतची तक्रार शिवाजीनगर पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी संशियांवर अपहरणसह "पोक्‍सो' अंतर्गत गुन्हे नोंदविले आहेत. या प्रकरणातील चारपैकी तीन संशयित हे पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. दोन जबरी चोरीचे गुन्हे शिवाजीनगर व गावभाग पोलिसांत दाखल आहेत. थोरात चौक येथे फुले विकून झोपलेल्या व्यक्तिकडून आठ हजार रुपये व मोबाईल लंपास केल्याबाबत गुन्हा नोंद आहे.

दरम्यान, यातील पिडीत मुलगी रस्ता पार करीत असताना संशयितांनी तिला दुचाकीवरुन अपहरण केले. शहरातील एका मुख्य चौकात ही घटना घडली. तिच्यावर अज्ञातस्थळी सामुहिक अत्याचार केल्यानंतर तिला संशयितांनी शिवनाकवाडी येथे सोडून दिले. यावेळी ती रडत असल्याचे पाहून काही नागरिकांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी तिने आपल्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक दिला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने शिवनाकवाडीला धाव घेवून मुलीला आपल्या ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर अत्यंत धक्कादायक घटना पुढे आली. 

या संपूर्ण घटनेने शहर हादरले आहे. विविध स्तरातून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. संशयितांना तातडीने अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. या घटनेमुळे शहरातील पोलिस यंत्रणाही खडबडून जागी झाली.

शहरात सेफ सिटी अंतर्गत सीसीटिव्ही बसविले आहेत. त्याचा आधार घेत संशयितांची माहिती गोळा करण्यात आली. त्यामध्ये चौघांची नावे निष्पन्न झाली. सर्व चौघांना घरातून अटक केली. इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस तसेच सेफ सीटी विभागाकडील पोलिस कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नानंतर काही तासातच संशयितांच्या मुसक्‍या आवळण्यात यश आले. 

गुन्हेगारांच्या शोधासाठी 12 टीम 

पोलिसांनी गुन्हेगारांच्या शोधासाठी तब्बल 12 पथके तयार केली. कोल्हापूर व इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक, पोलिस उप अधिक्षक यांची पथके, हुपरी पोलिस ठाणे आदी पथके तब्बल 36 तास अविरत कार्यरत होते. 
 

या प्रकरणातील संशियांतावर 50 दिवसांच्या आत परिपूर्ण दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
- गणेश बिरादार,
पोलिस उपअधिक्षक 
 

50 हजाराचे बक्षिस 

या संवेदनशिल प्रकरणातील संशयितांना पकडणे मोठे आव्हान होते. इचलकरंजी स्थानिक गुन्हे शाखा व सेफ सिटी विभागाकडे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 50 हजारांचे बक्षिस पोलिस दलाकडून जाहीर करण्यात आले.  

पाडव्याला सजलेल्या म्हशी म्हणाल्या  आमचं ठरलय, आता गोकुळ उरलय 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang Rape on Eight Year Old Girl Incidence in Ichalkaraji