Gas Cylinder
Gas CylinderSakal

गॅस भडकला; महागाईने सर्वसामान्य गृहिणींचे बजेटचे तीनतेरा

गेल्या अकरा महिन्यांत घरगुती गॅसदरात सबसिडी बंद करण्याचा दणका देऊन २०५ रुपये, तर व्यावसायिक गॅसदरात तब्बल ६६० रुपये भाववाढ झाली आहे.

आटपाडी - गेल्या अकरा महिन्यांत घरगुती गॅसदरात सबसिडी बंद करण्याचा दणका देऊन २०५ रुपये, तर व्यावसायिक गॅसदरात तब्बल ६६० रुपये भाववाढ झाली आहे. गॅसबरोबरच तेल आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या किमतीत पाच, सात ते दहा टक्के भाववाढ झाल्याने सर्वसामान्य गृहिणींच्या बजेटचे तीनतेरा वाजले; तर हॉटेल व्यावसायिक पदार्थांची भाववाढ करण्याच्या तयारीत आहेत. कोरोना साथीच्या धक्क्यातून सावरत असलेल्या सर्वसामान्य लोकांवर गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने दणका दिला आहे.

गावगाड्यातील छोटे-मोठे व्यवसाय अद्याप सावरलेले नाहीत; तर दुसरीकडे गत अकरा महिन्यांत घरगुती गॅसची केंद्र सरकारने सबसिडी बंद करून मोठा झटका दिला. सोबतच जानेवारीत ७०३ रुपयांच्या गॅसची किंमत ९०८ रुपयांपर्यंत पोचली आहे. अकरा महिन्यांत घरगुती गॅसच्या किमतीत २०० रुपये म्हणजेच ३० टक्के वाढ झाली. विविध योजनांतून सर्वसामान्य गृहिणींच्या घरात मोफत, तर काही ठिकाणी अल्पदरात गॅस पोचला. लोकांना सवय लागली आणि आता किंमत आवाक्याबाहेर गेल्याने गृहिणींनी पुन्हा चुलीकडे मोर्चा वळविला आहे. परिणामी, ग्रामीण भागात पुन्हा वृक्षतोड सुरू झाली.

Gas Cylinder
खरसुंडी रस्त्यावर वाळू तस्करी करणारा ट्रक जप्त; 'LCB'ची कारवाई

दुसरीकडे व्यावसायिकांच्या गॅसच्या किमतीत ११ महिन्यांत ६६० रुपये म्हणजेच ५० टक्के वाढ केली आहे. याची झळ ग्रामीण भागातील चहा आणि वडापावच्या टपऱ्या, छोटे, मध्यम आणि मोठे हॉटेल व्यावसायिक आणि रेस्टॉरंट चालकांना बसली आहे. व्यावसायिक गॅसच्या किमतीने दोन हजारांचा टप्पा ओलांडला. तसेच, गोडेतेल, इतर वस्तू आणि मजुरीत वाढ झाल्याने हॉटेलचालकांच्या नफ्यात मोठी गुंतवणूक करून आणि दिवस-रात्र राबूनही मोठी घट झाली आहे. सर्व हॉटेल व्यावसायिक पदार्थांच्या किमती वाढविण्याच्या तयारीत आहेत. चौकट- हॉटेल व्यावसायिकाला फटका मध्यम हॉटेल व्यावसायिकाला महिन्याला किमान १५ ते २० गॅसच्या टाक्या लागतात. दरात ६६० रुपये वाढ झाल्याने महिन्याला केवळ गॅससाठीच जादा १० ते १५ हजार रुपये मोजावे लागत आहेत. छोट्या व्यावसायिकांना पाच ते दहा, तर मोठ्या व्यवसायिकांना ३० ते ४० हजार रुपयांची झळ बसली.

माझ्या हॉटेलसाठी महिन्याला २२ ते २५ गॅसच्या टाक्या लागतात. ६५० रुपये वाढ झाल्याने महिन्यांच्या गॅसच्या खर्चात १५ हजारांची वाढ झाली आहे. इतर वस्तूंचेही भाव वाढले. पदार्थात वाढ केली नाही. मात्र, हॉटेलच्या पदार्थात वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय आमच्यासमोर नाही.

- एक हॉटेल व्यावसायिक, आटपाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com