Eknath Shinde : 'या' जिल्ह्यात प्रत्येकाला बंदूक द्या; CM शिंदे यांच्याकडं अजब मागणी

जिल्ह्यामध्ये (Sangli) गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडे, मारामारी, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे रोज घडत आहेत.
Sangli Gun Eknath Shinde
Sangli Gun Eknath Shindeesakal
Summary

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून या नशेखोर तरुणांच्या संघटित टोळ्या मोडून काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.

सांगली : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था इतकी बिघडली आहे की प्रत्येकाला सुरक्षेची चिंता वाटत आहे. व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व नागरिक अस्वस्थ आहेत. या प्रत्येकाला एक बंदूक (Gun) द्या, अशी उपरोधिक मागणी नागरिक जागृती मंचनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडं केली आहे.

मंचचे प्रमुख सतीश साखळकर यांनी निवेदनात म्हटलं आहे की, जिल्ह्यामध्ये (Sangli) गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडे, मारामारी, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे रोज घडत आहेत. अशा स्वरुपाचे गुन्हे करण्यासाठी नशेखोर तरुणांच्या संघटित टोळ्या तयार झाल्या आहेत.

Sangli Gun Eknath Shinde
Nanded : आंबेडकर जयंती केली म्हणून दलित तरुणाची निर्घृण हत्या; अशोक चव्हाण म्हणाले, 'वातावरण खराब करू नका'

या टोळ्या जीवे मारण्याच्या सुपाऱ्या घेणे, धमकावणे, हॉटेल, दुकान, आस्थापना यांची तोडफोड करणे, पैसे न देणे, महिलांशी गैरवर्तन करणे अशी दहशत माजवत आहेत. या नशेखोर संघटित टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून या नशेखोर तरुणांच्या संघटित टोळ्या मोडून काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.

Sangli Gun Eknath Shinde
Rishikant Shinde : राष्ट्रवादीत गद्दारी, पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळंच मी शिवसेनेत प्रवेश केला; शिंदेंच्या भावाची कबुली

दोन दिवसांपूर्वी एका नगरसेवकावर काही नशेखोर तरुणांनी जीवघेणा हल्ला केला. त्या नगरसेवकाने स्वतःजवळ असलेल्या परवानाधारक बंदुकीतून गोळ्या झाडल्यावर ते सर्व नशेखोर तरुण पळून गेले. त्या नगरसेवकांचा जीव वाचला. एखाद्या नगरसेवकाची अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्य नागरिकांची काय गत होईल?

Sangli Gun Eknath Shinde
Nanded Crime : लग्नाच्या वरातीत गेल्यामुळं दलित तरुणाची निर्घृण हत्या; नवरदेवासह सात जणांना पोलीस कोठडी

गेल्या काही दिवसांतील पोलिसांची कामगिरी पाहता सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांवर अवलंबून न राहता व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला व नागरिकांना बंदूक परवाने द्यावेत. प्रत्येकाने बंदूक घेऊन फिरावे आणि स्वतःचे संरक्षण करावे, अशी वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com