आठवले म्हणतात, मनसेसोबत भाजपची नकोयुती नाही तर होईल माती 

Going with the MNS will hurt the BJP
Going with the MNS will hurt the BJP

संगमनेर: ""झेंड्याचा रंग बदलून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोणताही राजकीय फायदा होणार नाही. त्याऐवजी त्यांनी आपले मन आणि भूमिका बदलावी. भाजपने मनसेसोबत युती करू नये. त्याचा मोठा फटका भाजपला बसेल,'' असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले. 

ठाकरेंच्या फक्त सभांनाच गर्दी 
रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यासाठी आठवले अकोले येथे गेले होते. तेथून परतताना ते येथे पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत बोलणारे प्रभावी वक्ते आहेत; पण त्यांच्या सभांना होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित होत नसल्याचा त्यांनाही अनुभव आहे, अशी कोपरखळी मारून आठवले म्हणाले, ""भाजपला बहुजनांच्या मतांसाठी मनसेची आवश्‍यकता नाही. दलित, अल्पसंख्याक व बहुजनांची मते मिळवून देण्यासाठी "आरपीआय' समर्थ आहे.'' भीमा कोरेगाव येथील दंगलीच्या "एसआयटी'कडून चौकशीबाबत ते म्हणाले, की याप्रकरणी मराठा समाजाने दाखविलेल्या सामंजस्याच्या भूमिकेबद्दल आदर आहे. प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेल्या "बंद'मध्ये मंत्री म्हणून भूमिका घेता येणे शक्‍य नव्हते; मात्र माझा संपूर्ण पक्ष त्यात अग्रभागी होता. नवीन सरकारला या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. 

सीएएला रिपाईंचा पाठिंबा 
एनआरसी आणि सीएए या कायद्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारमधील तिन्ही पक्षांनी राज्याच्या हितासाठी आणि सरकार टिकविण्याकरिता मतभेद बाजूला ठेवून भूमिका बदलावी, असा सल्लाही आठवले यांनी दिला. इंदू मिलच्या जागेत होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पैसे वाडिया हॉस्पिटलला न देता, त्यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिकेने स्वतंत्र निधी देण्याची मागणी त्यांनी केली. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com