

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला असून, त्याचे पडसाद कोल्हापूरपासून मुंबई ते दिल्लीपर्यंत उमटू लागले आहेत. शासनाच्या एका अध्यादेशाच्या माध्यमातून गोकुळमध्ये चार ते पाच शासननियुक्त संचालक आणण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. यातील चार संचालकांना मतदानाचा अधिकार मिळाल्यास गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक महायुतीच्या बाजूने जाऊ शकते, अशी चर्चा आहे. याच निर्णयाच्या विरोधात आज (सोमवारी) कोल्हापुरात सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी गावागावांतून हजारो लोक कोल्हापूरमध्ये जमा होऊ लागले आहेत.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा