esakal | ब्रेकिंग - शिक्षकांसाठी खुशखबर; सरकारने उचलले मोठे पाऊल

बोलून बातमी शोधा

Government approves seven months grant for Teacher

जुलै महिन्यापासून वेतनाच्या प्रतिक्षेत असलेल्या अतिथी शिक्षकांची परवड आता थांबणार आहे. त्यांच्या वेतनासाठी सरकारने अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे, लवकरच त्यांना वेतन मिळणार आहे.

ब्रेकिंग - शिक्षकांसाठी खुशखबर; सरकारने उचलले मोठे पाऊल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : जुलै महिन्यापासून वेतनाच्या प्रतिक्षेत असलेल्या अतिथी शिक्षकांची परवड आता थांबणार आहे. त्यांच्या वेतनासाठी सरकारने अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे, लवकरच त्यांना वेतन मिळणार आहे. 

हे पण वाचा - शेतकऱ्यांच्या जीवाला त्या प्राण्यांपासून धोका...

राज्यात प्राथमिक शाळांमध्ये 10 हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. या जागांवर कायमस्वरुपी शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक असताना गेल्या काही वर्षांपासून अतिथी शिक्षकांची नेमणुक केली जात आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्षाची सुरवात झाल्यानंतर जुलैमध्ये अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जाते. 2019-20 च्या शैक्षणिक वर्षात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 700 हून अधिक अतिथी शिक्षकांची नेमणूक केली आहे. परंतु, जुलैपासून त्यांना एकदाही मासिक वेतन दिलेले नाही. सर्व अतिथी बिनपगारी काम करत असल्याने त्यांची परवड चालली होती. उदरनिर्वाह करणे अवघड होऊन बसले होते. याबाबत अनेकदा आवाज उठविला. पण, त्याचा काही उपयोग झाला नव्हता. 

हे पण वाचा - राणेंमुळेच सिंधुदुर्गचा विकास थांबला....

आता काही दिवसांपूर्वी अतिथी शिक्षकांच्या वेतनासाठी अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे, सात महिन्यांचे वेतन लवकरच त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे, या शिक्षकांची परवड थांबणार असली तरी त्यांना दरमहा वेतन देणे आवश्‍यक आहे. अनेक शिक्षक लांब ठिकाणाहून शाळेला येत असतात. त्यांना प्रवासाचा खर्च करावा लागतो. पण, वेतन नसल्याने पदरमोड करावी लागते. त्यामुळे, भविष्यात त्यांना दरमहा वेतन द्यावे, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी शिक्षण खात्याकडून विविध उपक्रम राबविले जात असून त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. असे असताना अतिथी शिक्षकांचे वेतन देण्यास विलंब का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. या अतिथी शिक्षकांवर विद्यार्थ्यांना शिकविण्याबरोबरच इतर कामांचाही बोजा टाकला जात आहे. याचा विचारही होणे आवश्‍यक आहे. 

हे पण वाचा - का आली शेतकऱ्यांवर एवढी वाईट वेळ? 

अतिथी शिक्षकांच्या वेतनाबाबत अनेकदा पाठपुरावा करण्यात आला होता. परंतु, अनुदान मंजूर होण्यास विलंब झाल्याने वेतन देण्यास अडचण येत होती. आता अनुदान मंजूर झाले असून लवकरच वेतन संबंधितांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. 
- अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी