esakal | बेळगावात पदवी, पदव्युत्तर परिक्षांर्थींना लसीकरण बंधनकारकच
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगावात पदवी, पदव्युत्तर परिक्षांर्थींना लसीकरण बंधनकारकच

बेळगावात पदवी, पदव्युत्तर परिक्षांर्थींना लसीकरण बंधनकारकच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बेळगाव : राणी चन्नमा विद्यापीठाने (आरसीयु) (RCU) पदवी आणि पदव्युत्तरच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी लसीकरण (covid-19 vaccine) करून घेणे बंधनकारक केले आहे. परीक्षेपूर्वी विद्यापीठाला कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र व निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. यासंबंधीचे एक पत्रकच विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. (belgaum)

राणी चन्नमा विद्यापीठाच्या अख्त्यारीत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयांच्या प्राचार्य व प्राध्यापकांना यासंबंधीच्या सुचना केल्या आहेत. सर्व पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा सरकारने दिलेल्या कोरोनाच्या (covid-19) मार्गसुचीनुसार व नियमानुसार घेण्यात याव्यात. पदवीच्या शिल्लक असलेल्या लिखीत परीक्षा २६ जुलै रोजी घ्याव्यात व पदव्युत्तरच्या परीक्षा २७ पासून घेण्यात याव्यात, अशा सूचना विद्यापीठाने केल्या आहेत.

हेही वाचा: MPSC च्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची राज्य सरकारला विनंती

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपापल्या महाविद्यालयात परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना लसीकरण बंधनकारक करावे. लसीकरण करून न घेतलेल्या व कोरोना टेस्ट न केलेल्या विद्यार्थ्यांला परीक्षेला बसता येणार नाही. याची माहिती परीक्षार्थी विद्यार्थ्यांना द्यावी. सध्या ज्या परीक्षा सुरु आहेत. त्या तशाच घ्याव्यात. पदवी आणि पदव्युत्तरच्या शिल्लक राहिलेल्या परिक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विद्यापीठाने आणि सरकारने घालून दिलेल्या कोविड नियमावलीचे काटेकोर पालन करून या परीक्षा सुरळीतपणे पार पाडाव्यात, अशा सूचना केल्या आहेत. परीक्षेला अवघे १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यातच विद्यापीठाने कोरोना चाचणी सक्तीची केल्यामुळे परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची घाईगडबड होणार आहे.

गर्दीची शक्यता

पदवी आणि पदव्युत्तरचे शेकडो विद्यार्थी आहेत. परीक्षेच्या दोन दिवस आगोदर ही चाचणी करावी लागणार आहे. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी होणार आहे.

हेही वाचा: पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा बहुगुणी अळू शरीरासाठी फायद्याचा

loading image