बेळगाव - पोलिस बंदोबस्तात दुसऱ्या दिवशीही बायपासचे काम सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

belgaum

सातत्याने या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

बेळगाव - पोलिस बंदोबस्तात दुसऱ्या दिवशीही बायपासचे काम सुरूच

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : पोलिस बंदोबस्तात सलग दुसऱ्या दिवशी 'हलगा मच्छे बायपास'चे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कामाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकरी सकाळपासून शिवारात ठाम मांडून आहेत. 2009 पासून हलगा मच्छे बायपास करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र सातत्याने या कामाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच न्यायालयीन लढाही अनेक वर्षे दिला जात आहे.

पोलिस बळाचा वापर करून रस्ता करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात असून गुरुवारी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची धरपकड करून काम हाती घेण्यात आले होते. यावेळी एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. महिला शेतकऱ्यांनीही रस्त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र या सर्वाकडे दुर्लक्ष करत रस्त्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा ठेवण्यात आल्याने शेतकरीही हतबल झाले आहेत.

हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा आणखी तीन दिवस कोठडीत मुक्काम वाढला

दुसऱ्या दिवशी काम सुरू करताना पुन्हा विरोध होऊ नये यासाठी अधिक प्रमाणात पोलिस फौजफाटा सकाळपासूनच देण्यात आला असून अग्निशमन दलाच्या 4 वाहनांसह रुग्णवाहिका उभ्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी बायपासचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करुन शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी झिरो पॉइंट निश्चित केल्याशिवाय काम का हाती घेतला अशी विचारणा केली. मात्र जिल्हाधिकारी कोणत्याही प्रकारचे उत्तर न देता निघून गेले. शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढून काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महामार्ग प्राधिकरणतर्फे करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा: आर्यन खानने लावली NCB कार्यालयात हजेरी; 4 मिनिटांत पडला बाहेर

loading image
go to top