यामुळे मागणी वाढली मोड आलेल्या कडधान्यांना!

This has led to increased demand for cereals
This has led to increased demand for cereals

वैराग (सोलापूर) : रासायनिक व कीटकनाशक पालेभाजीवर फवारत असल्याने आता मोड आलेल्या कडधान्यांचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता मोड आलेल्या कडधान्यांना मागणी वाढत आहे. शेती व्यवसायात पालेभाजी प्रकारात मोठ्या प्रमाणावर रासायनिक घटकांचा वापर वाढल्याने याचा परिणाम ग्रामीण भागात दिसत आहे. दैनंदिन वापरात पालेभाज्यांपेक्षा आता कडधान्यांना मागणी वाढली आहे. 

मोड आलेली कडधान्ये आरोग्यास चांगली ठरत आहेत. आठ ते 10 तास पाण्यात भिजवून सुती कापडात बांधल्यास त्यास चांगले मोड येतात. ते पचायला सोपे असून जीवनसत्वात दुप्पट वाढ होते. कडधान्याने वातुळपणा कमी होतो. लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न आणलेल्या कडधान्यांत टॅटीन, फायटिक ऍसिड आणि ट्रिप्सीन इनहिबीटर ही तीन अशोषक द्रव्ये असतात. टॅनीनमुळे लोहाच्या शोषणात अडथळा निर्माण होतो आणि फायटिक आम्लामुळे कॅल्शियमचे शोषण कमी होते. कडधान्ये मोड आणून चांगली भिजवली तर ट्रिप्सीन इनहिबीटरचा नाश होतो. 

आरोग्याची गुरुकिल्ली! 
कडधान्याने वातुळपणा कमी होतो. मोड आलेली धान्ये पचनास चांगली असून सर्व जीवनसत्वांची जास्त वाढ होते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कार्बोदके याचा एक समृद्ध खजिना म्हणजे मोड आलेली कडधान्ये होय. याचा दैनंदिन आहारात समावेश म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली मानली जाते. 

तज्ज्ञांच्या मते कोणती कडधान्ये खावीत 
तज्ज्ञांच्या मते सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी, मूग होय. चवळी, हरभरा हे पचायला जड असते. त्यात पोषक तत्त्वे असतात. 100 ग्रॅम कडधान्यांत जवळपास 17 ते 25 टक्केपर्यंत प्रथिने असतात. याला सोयाबीन अपवाद आहे. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये 43 टक्के प्रथिने असतात. शाकाहारी आहारात उत्तम दर्जाच्या प्रथिनांची पूर्तता करण्यासाठी याच प्रकारच्या कडधान्यांचा उपयोग केला जातो. परंतु, सोयाबीनचे साल करणे आवश्‍यक असल्याचे आहारतज्ज्ञ डॉ. परेश विभूते यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com