आता 'या' शेतकऱ्यांना आले "अच्छे दिन'

Onion Price Hiked In Local And Global Market
Onion Price Hiked In Local And Global Market
Updated on

भुईंज (जि. सातारा) : कांदे भाववाढीचा फायदा कोबीला झाल्याने कोबी उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात अच्छे दिन आलेले आहेत. भुईंज परिसरात हॉटेलमध्ये कोबी, काकडी व मुळ्याचा वापर वाढला आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  

बाजारात जास्त मागणी आणि पुरवठा अत्यल्प झाल्यामुळे कांद्याचे भाव वाढले असून, ग्रामीण भागातही कांद्याने नव्वदी, शंभरी गाठली आहे. दरम्यान, हॉटेलमधूनही कांदा हद्दपार झाला असून, त्याच्या जागी कोबीचा वापर होत आहे. हॉटेलमध्ये कांदा मिळालाच तर तो दोन-तीन फोडी नावालाच असतो. त्याबदल्यात मुळा आणि काकडीचा सर्रास वापर केला जात आहे. कांद्याच्या या टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने तुर्कस्तानहून कांदा आयात केला असला तरी तो अद्याप दाखल झालेला नाही. परिणामी भविष्यातही कांदा चांगलाच रडविणार असल्याचे दिसून येत आहे. कांद्याने केला सगळ्यांचाच वांदा, अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत. चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादकांना सुगीचा काळ आल्याचे बोलले जात आहे.

अवश्य वाचा : वो भी दिन थे... जेव्हा वडापावच्या गाडीवर कांदा मिळायचा 

यंदा लांबलेला पावसाळा अधिक प्रमाणात पडलेला अवकाळी पाऊस, वादळी वातावरण आणि आता ढगाळी वातावरण यामुळे कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर खराब झाले. यामुळे कांद्याची आवक रोडावून दर हळूहळू वाढू लागले. सुरवातीला सप्टेंबरअखेरीस 40 ते 50 रुपयांदरम्यान असलेला कांदा ऑक्‍टोबर महिन्यात 60 च्या घरात गेला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 70 रुपयांवर असलेला कांदा डिसेंबर महिन्यात 80 ते 90 रुपये प्रति किलोपर्यंत पोचला आहे.

जरुर वाचा : कांदा महागलाय; जाणून घ्या काय आहेत किचनमध्ये ऑप्शन्स...  

हॉटेल, हातगाड्यांवर कांदाभजी विक्रीच बंद केली असून, काही ठिकाणी कोबीभजी तयार करून विक्री करीत आहेत. हे विक्रेते कांद्याऐवजी कोबीचा वापर करीत असल्याने कोबीच्या विक्रीतही प्रचंड वाढ झालेली आहे. पूर्वी दहा रुपयाला मिळणारा कोबीचा गड्डा आता 20 ते 30 रुपयांना 
मिळू लागला आहे. कांदे भाववाढीचा फायदा कोबीला झाल्याने कोबी उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात अच्छे दिन आलेले आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
When will Sangli DCC Bank recruitment restart?
Koyna Dam water level July 2026
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com