सातारा : आण रे काडेपेटी..काडेपेटी आण रे म्हणतच हॉकर्सने ओतले अंगावर रॉकेल

सातारा : आण रे काडेपेटी..काडेपेटी आण रे म्हणतच हॉकर्सने ओतले अंगावर रॉकेल

सातारा : शहरातील मुख्य बसस्थानकनजीक आज (गुरुवार) वाहतुक शाखेच्या पाेलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे बाजूला काढण्याची सूचना संबंधित टपरीधारकांना केली. दूसरीकडे नगरसेवकांच्या आव्हानानंतर पालिका प्रशासनाने सातारा शहरातील अतिक्रमणांवर चक्क बूलडाेझरच फिरविण्यास प्रारंभ केला आहे. बसस्थानक परिसरानजीकची अतिक्रमणे काढली जाऊ नयेत यासाठी हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या  अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. 
 
सातारा शहरातील अतिक्रमणांमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पालिका प्रशासन त्यावर काेणतीच ठाेस कारवाई करीत नाही. प्रशासनाचा काेणताच धाक नाही असा आराेप विराेधी पक्षनेते अशाेक माेने यांनी पालिका सभागृहात केली हाेती. तसेच अतिक्रमण काढून दाखविण्याचे धाडस दाखवावे असे आव्हानही प्रशासनास दिले हाेते. त्यानंतर साेमवारपासून (ता. 17) अतिक्रमणांविरोधात सातारा पालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नजीकच्या अतिक्रमणांवर बुलडाेजरच फिरविला.

वाचा :  उदयनराजे भाेसलेंचा जनतेस संदेश

आज (गुुरुवार) पोलिसांच्या वाहतूक शाखेने बसस्थानकासमोरील अतिक्रमणे हटविण्याची सूचना तेथील टपरी व्यावसायिकांना केली. तसेच सकाळच्या प्रहरी पदपाथवर बसलेल्या भाजी विक्रेत्यांना मंडईत जाऊन बसायला सांगितले. त्यानंतर दहाच्या सुमारास सेव्हन स्टार मल्टीप्लेक्स व इमारत या ठिकाणच्या पदपथावर उभ्या केलेल्या हातगाडीधारकांनी उभारलेले बांबूचे शेड काढण्याची सूचना केली. परंतु टपरीधारकांनी त्यास दाद दिले नाही. अखेर पोलिसांनी पदपथ आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणांवर मार्ग काढण्यास प्रारंभ केला. त्यास हाॅकर्स संघटनेच्या पदाधिकारी यांनी विराेध केला. 

हेही वाचा : महाराज...आमचे ही रक्त सळसळतंय

ही मोहीम तातडीने थांबविण्यात यावी अशी मागणी सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटनेच्या वतीने करण्यात आले. हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकम, सातारा शहर अध्यक्ष संजय पवार यांच्यासह तेथील हातगाडीधारक एकत्र आले. त्याच वेळी संजय पवार व लक्ष्मण निकम यांनी बाटलीतील रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. द्या काडीपेटी, द्या काडेपेटी असे म्हणत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. परंतु त्यातील संजय पवार हे काही केल्या थांबत नव्हते. अखेर त्यांना काही नागरीकांनी धरले आणि डाेक्यावर पाणी मारले. पाेलिसांच्या आणि नागरीकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.

वाचा ः चर्चा तर हाेणारच...सातारा पालिकेची चर्चाच चर्चाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com