esakal | सांगली जिल्ह्यात आला पाण्याचा दुष्काळ...
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy water scarcity in the eastern part of Mirage sangli marathi news

"मिरज पूर्व भागात भीषण पाणी टंचाई' ..म्हैसाळचे आवर्तन लांबल्याचा परिणाम; पिण्यासाठी पाणी मिळेना.. 

सांगली जिल्ह्यात आला पाण्याचा दुष्काळ...

sakal_logo
By
निरंजन सुतार

आरग (सांगली) : सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागातील तालुक्‍यासाठी जीवनदायी व आशादायी असणारी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाणी आवर्तनाचे नियोजन तत्काळ करून योजना चार दिवसात चालू करावी. तसेच भीषण पाणी टंचाई, कोरडा दुष्काळ, पिकांची होरपळ व संभाव्य धोका लक्षात घेता याबाबत पाटबंधारे विभागाने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ आवर्तन चालू करावे, अशी मागणी मिरज पूर्व भागातील ग्रामस्थांनी केली आहे. 

मिरज पूर्व भाग हा पूर्वीपासूनच पाण्यासाठी वंचित राहिलेला भाग आहे. परंतु म्हैसाळ योजनेमुळे या परिसरातील अनेक गावांचा एन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. मात्र, एक मार्चला सुरू होणारी म्हैसाळ योजना अद्याप सुरू झाली नसल्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. 

हेही वाचा- उन्हाळ्यात असा घ्यावा आहार....

विहिरींना गाटला तळ

आरग येथील पाझर तलाव पूर्णपणे कोरडा झाला असून तलावात पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही. पाझर तलावा शेजारीच असणाऱ्या संपूर्ण आरग गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विहिरीने सध्या मागील महिन्यातच तळ गाठला असून विहीर कोरडी ठोक झाली आहे. त्यामुळे सध्या गावाला दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच सर्वत्र पाणीटंचाईचे संकट उभे राहिले असून परिसरातील सर्व पाणी स्रोत आटले आहेत. 
यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच भीषण पाणी टंचाई जाणवू लागल्याने परिसरातील विहिरींना तळ गाटला आहे. 

हेही वाचा- शेतकर्‍यांनो तुमची ही योजना झाली बंद....

कूपनलिकेतील पाणी आठले

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून पाण्याची पातळी खालावली आहे. बऱ्याच गावांना पिण्याचे पाणी मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यातच तलाव कोरडा झाला असून. कूपनलिकेतील पाणी आठले आहे. पाण्याअभावी बारामही बागायती सह रब्बी पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन म्हैसाळ आवर्तन लवकरात लवकर सुरू करण्याची आग्रही मागणी मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ व जत परिसरातील ग्रामस्थांची आहे 

हेही वाचा-  टेबलावरच्या या फाईलला मिळेल का न्याय...

 म्हैसाळ च्या योजनेसाठी शेतकऱ्यांचा मागणी आर्ज
म्हैसाळ उपसा सिंचन योजना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी तालुका तसेच गाव पातळीवरून पाणी मागणी अर्ज येणे अपेक्षित आहे, असे आवाहन यापूर्वी पाटबंधारे विभागाने केले होते. किमान गावातून सामूहिक एक अर्ज तरी शेतकऱ्यांच्या वतीने येणे आवश्‍यक आहे. मागणीनुसार आवर्तन लवकरात लवकर सुरू करून पाणी सोडणे सोपे जाणार आहे. 

 आवर्तन लांबल्याने ; शेतकऱ्यांमध्ये नाराजी .. 
मिरज पूर्व भागाबरोबरच कवठेमहांकाळ व जत तालुक्‍यात भीषण पाणी टंचाई जाणवत असल्याने योजना लवकरात लवकर चालू करून दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्याला जीवदान देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. परिसरातील सर्व पाण्याची स्रोत्र आठल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आवर्तन लांबल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.  
 
 

loading image