esakal | शेतकर्‍यांनो तुमची 'ही योजना' झाली बंद....
sakal

बोलून बातमी शोधा

cm solar agricultural pump scheme in ratnagiri kokan marathi news

मुख्यमंत्री सौर कृषी पंपाने शेतकर्‍यांचे अनेक अडसर दूर केले आहेत. शेती पंप हवा असेल तर वीज जोडणीसाठी विद्युत खांब, जागा या अनेक अडचणीतून शेतकर्‍यांची सुटका झाल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

शेतकर्‍यांनो तुमची 'ही योजना' झाली बंद....

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : मुख्यमंत्री सौर कृषी पंपाने शेतकर्‍यांचे अनेक अडसर दूर केले आहेत. शेती पंप हवा असेल तर वीज जोडणीसाठी विद्युत खांब, जागा या अनेक अडचणीतून शेतकर्‍यांची सुटका झाल्याने या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आज 288 सौर पंप शेतीची तहान भागवत आहेत. तर योजनेचा लाभ घेण्यासाठी 846 अर्ज प्राप्त झाले असून 568 जणांनी त्यासाठी पैसे भरले आहेत. मात्र जिल्ह्याचे अर्जांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत ‘डिस्कनेक्ट’ करण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील दुर्गम भागात वीजवाहिन्या टाकण्यात अनेक अडचणी येतात. काही वेळा जागा उपलब्ध होत नाही. डोंगराळ भागात विद्युत खांब उभारणे, वाहतूक करणे अवघड होते. तर अनेकवेळा काम करण्यासाठी ठेकेदार उपलब्ध होत नाहीत. खासगी जागेत खांब उभारण्यास होणारा विरोध आदी कारणांमुळे शेती पंपाची वीज कनेक्शन प्रलंबित राहतात.

हेही वाचा- शिवसेना जिल्हाप्रमुखांना खिशात घेवून फिरण्यासाठी सात जन्म लागतील -

सौरपंपासाठीची अर्ज प्रक्रिया डिस्कनेक्ट.

योजना असूनही शेतकर्‍यांना प्रत्यक्ष त्याचा लाभ मिळत नाही. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अस्तित्वात आणली. या योजनेला अनुदानही देण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रवर्गासाठी शासनाने सवलत दिली आहे. त्यामध्ये 3 हॉर्स पॉवरचा सौर पंप एसटी आणि एसी प्रवर्गासाठी 8 हजार 260 रुपये तर खुल्या प्रवर्गासाठी 16 हजार 560 रुपये तर 5 हॉर्सपॉवरचा सौर पंपासाठी एसटी आणि एसी प्रवर्गाला 12 हजार 355 तर खुल्या प्रवर्गाला 24 हजार 70 रुपये भरावे लागतात.

हेही वाचा- शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर यामुळे हसू उमटले....

कृषी पंपासाठी ऑनलाइन नोंदणी

सौर पंप बसवण्यासाठी चार कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षे कंपनीमार्फत युनिटची देखभाल केली जाते तर दहा वर्षात सौर प्लेट नादुरुस्त झाल्यास कंपनीमार्फत ती बदलून देण्यात येते. ज्या शेतकर्‍यांनी कृषी पंप घेतले नाहीत त्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे केले होते. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून सौरपंपासाठी 846 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 568 शेतकर्‍यांनी पैसे भरले आहेत. त्यापैकी 288 शेतकर्‍यांसाठी सौरपंप जोडण्यात आले आहेत. जिल्ह्याला सौरपंपाच्या अर्जासाठी जे उद्दिष्ट्य दिले होते ते पूर्ण झाले आहे. त्यामुळे सध्या तरी नवीन अर्जांना बंदी आली आहे. पुढील आदेशापर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.

हेही वाचा- वेळ आली होती पण काळ आला नव्हता... ​
शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्जांची संख्यादेखील चांगली आहे. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

-देवेंद्र सायनेकर, अधीक्षक अभियंता, महावितरण

 
 

loading image
go to top