esakal | टेबलावरच्या या फाईलला मिळेल का न्याय...
sakal

बोलून बातमी शोधा

sindudurg construction department kokan marathi news

देवगड तालुक्‍यातील विठ्ठलादेवी ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरण कामाची फाईल तब्बल ५० दिवस बांधकाम विभागात एकाच टेबलवर तांत्रिक मान्यतेसाठी पडून आहे.

टेबलावरच्या या फाईलला मिळेल का न्याय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : देवगड तालुक्‍यातील विठ्ठलादेवी ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरण कामाची फाईल तब्बल ५० दिवस बांधकाम विभागात एकाच टेबलवर तांत्रिक मान्यतेसाठी पडून आहे. काही अधिकारी, कर्मचारी कामात चालढकल करीत असल्यानेच जिल्ह्यात अनेक कामे निधी असूनही रेंगाळली आहेत, असा आरोप सदस्य प्रदीप नारकर यांनी सभेत केला. सरकारी काम आणि सहा महिने थांब हा प्रशासनावर लागलेला डाग अशाने कसा पुसला जाणार, असा प्रश्‍नही त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती रवींद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, सदस्य प्रदीप नारकर, रेश्‍मा सावंत, संजय आग्रे, राजेश कविटकर, श्रीया सावंत, राजन मुळीक उपस्थित होते. 

हेही वाचा- वेळ आली होती पण काळ आला नव्हता...

सरकारी काम आणि सहा महिने थांब
मागील सभेत सदस्यांनी केलेल्या सूचना आणि त्यावर झालेली पूर्तता याबाबत आढावा घेतला असता देवगड तालुक्‍यातील नाद आरोग्य उपकेंद्र नूतनीकरणासाठीचे अद्यापही अंदाजपत्रक तयार केलेले नाही. विविध सुचनांबाबत प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याचे उघड झाले. याबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सदस्यांच्या सूचनांचा गांभीर्याने विचार होत नसेल तर आम्ही सभेत बसून उपयोग काय? ज्या जनतेने आम्हाला या सभागृहात प्रतिनिधित्व करायला पाठविले, त्यांना आम्ही काय उत्तर देणार? असा प्रश्‍न उपस्थित करत सर्वच सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा-  त्याला पकडले पण तो हातावर तुरी देऊन पळाला....

फाईल ५० दिवस एकाच टेबलावर
देवगड तालुक्‍यातील विठ्ठलादेवी ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरणाचे काम मंजूर आहे. या कामाच्या तांत्रिक मान्यतेसाठी बांधकाम विभागात तब्बल ५० दिवस एकाच टेबलवर फाईल पडून आहे. तांत्रिक मान्यता देण्यास एवढा कालावधी लागत असेल तर कामे कशी होणार? काही अधिकारी - कर्मचारी जाणीवपूर्वक कामात चालढकल करीत असल्यानेच जिल्ह्यातील विविध कामे निधी असूनही रेंगाळली आहेत, असा आरोप सदस्य नारकर यांनी केला. प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने गेली अनेक वर्षापासून प्रशासकीय काम आणि सहा महिने थांब असा प्रशासनावर ठपका लागलेला आहे. तो अशाने पुसला जाणार का? असा प्रश्‍नही त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

हेही वाचा-   गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील

नव्या गाड्यांचे प्रस्ताव सादर करा
जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गाड्या जीर्ण झाल्या आहेत. त्या निर्लेखित करणे आवश्‍यक असतानाही काही गाड्या ढकलून सुरू कराव्या लागतात. ही वस्तुस्थिती सभागृहासमोर आली असता प्राथमिक आरोग्य केंद्राकडील जीर्ण झालेल्या गाड्या निर्लेखित करून नवीन गाड्यांसाठी प्रस्ताव सादर करा, अशी सूचना सदस्य रेश्‍मा सावंत यांनी केली. जिल्हा परिषद भवनासमोरील गेट, फलक आणि चौकीच्या दुरुस्तीसाठी २ लाख खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.

पाणीटंचाईप्रश्‍नी प्रपत्र अ सादर करा
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या साडेसात कोटींच्या आराखड्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी अद्यापही काही तालुक्‍यांतून एकही प्रपत्र अ प्राप्त झालेले नाही, अशी माहिती सभेत देण्यात आली. तर पाणीटंचाईची कामे वेळेत पूर्ण करून टंचाई दूर करता यावी, यासाठी प्रत्येक तालुक्‍याने वेळीच प्रपत्र अ सादर करावीत, असे आदेश सभापती जठार यांनी सभेत दिले. 

loading image
go to top