

Helicopter Baijya and Brake Fail Pair Win Fortuner in Sangli Bullock Race
Esakal
सांगलीत आयोजित केलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीत हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेक फेल या बैलजोडीनं मैदान मारत फॉर्च्युनर गाडी जिंकली. चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत आलिशान गाड्या आणि आकर्षक बक्षीसांची खैरात करण्यात आलीय. सर्वात मोठी बैलगाडा शर्यत म्हणून या शर्यतीची सर्वत्र चर्चा सुरू होती. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस फॉर्च्युनर, तर दुसऱ्या क्रमांकाला थार मिळणार आहे. या बक्षीसाचं वितरण मंत्रालयात एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार असल्याचंही चंद्रहार पाटील यांनी सांगितलं.