दुध उत्पादकांसाठी खुशखबर; अकरा डिंसेबरपासून खरेदी दरात वाढ

Hike In Milk Purchase Rate By Two Rupees
Hike In Milk Purchase Rate By Two Rupees

कोल्हापूर -  जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली. दरवाढ ११ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे व वारणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. 

या निर्णयाने महापूर व अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. म्हैस दुधाचा दर यापूर्वीच शासनाच्या दरापेक्षा जास्त असल्याने या दरात वाढ झालेली नाही. ‘गोकुळ’च्या २ डिसेंबरच्या संचालक मंडळाच्या बैठकीतच गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंगळवारी (ता. ३) या संदर्भातील पत्र प्राथमिक दूध संस्थांना पाठविण्यात आले. पूर्वी गायीच्या साडेतीन फॅट दुधाला प्रतिलिटर २६.४० रुपये खरेदी दर होता. तो ११ डिसेंबरपासून २८.४० रुपये होणार आहे. यात संस्था कमिशनपोटी दिल्या जाणाऱ्या प्रतिलिटर १.४० रुपयांचा समावेश आहे. 

वारणेच्या दरातही वाढ

महापूर, अवकाळी पावसाने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. प्रचंड पावसामुळे वैरणीचाही प्रश्‍न गंभीर बनला. वैरणीच्या टंचाईमुळे वैरणीचे दर वाढले आहेत. त्यामुळे गायीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय वारणेच्या संचालक मंडळाने घेतला. गायीच्या दुधास ३.५ फॅट व ८.५ एसएनएफला प्रतिलिटरला २५ रुपये दर होता. ११ डिसेंबरपासून तो २७ रुपये दिला जाणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांनी दिली.

दर असा

फॅंट*     जुना दर      नवीन दर
*३.५    २५ रुपये       २७ रुपये
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com