
- अकलूजच्या बाजारात उत्साह
- घोड्यांच्या नाचकाम स्पर्धा विविध प्रकारांचे दर्शन
- परातीतल्या डान्सने जिंकली उपस्थितांची मने
अकलूज ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित घोड्यांच्या नाचकाम व चालीच्या स्पर्धा शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात पार पडल्या. फक्त मालकाच्या इशाऱ्यावर लंगडी, नाणिन डांन्स, पाळणा करणे, बाजेवर, स्टूलवर अथवा परातीत विविध नाचाचे प्रकार करीत घोड्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
जुळे सोलापुरात "यांनी" लावले दिवे
अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने घोडे मालकांना प्रोत्साहन देण्यासाठी सालाबादप्रमाणे याही वर्षी घोड्यांच्या नाचकाम व चालीच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सभापती मदनसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, आप्पासाहेब जगदाळे, सचिव राजेंद्र काकडे, समितीचे संचालक आदी उपस्थित होते.
सुवर्णाताई दुचाकीवरून घालताहेत दुधाचा वरवा
यावेळी झालेल्या स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकास अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजार रूपये अशी बक्षिसे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण शफी तांबोळी, संदिप पांढरे, विठ्ठल ठोंबरे, राजेंद्र काकडे यांनी केले तर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी दिनेश माने देशमुख, धनंजय माने देशमुख, शिवराज पाटील, अमोल पिसे, अनिल सावंत, प्रशांत उराडे यांनी परिश्रम घेतले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थी संख्या घटतेय
स्पर्धेचा निकाल
- घोड्याच्या चालीच्या स्पर्धेत सराटी (ता. इंदापूर) येथील यशराज जगदाळे यांच्या घोड्याने पटकावला प्रथम क्रमांक
- भोडणीचे नितीन गोसावी यांच्या घोडा द्वितीय तर पृथ्वीराज पाटील (लव्हे) व नारायण पाटील (करमाळा) यांच्या घोड्यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला
- नाचकाम स्पर्धेत महादेव खोमने (माळेगांव) यांच्या घोड्याचा प्रथम पटकावला
- गोविंद मदने (कटगूण) यांच्या घोड्याचा व्दितीय तर श्री. होमने (माळेगांव) यांच्या घोड्याने तृतीय क्रमांक मिळविला
- सर्वगुण संपन्न घोड्यात महेंद्र थोरात पिंपळगांव यांच्या घोड्याने प्रथम क्रमांक पटकावला
- पांडुरंग शिंदे (भोडणी) यांच्या घोड्याने व्दितीय तर नितीन गोसावी (भोडणी) यांच्या घोड्याने तृतीय क्रमांक पटकावला