मोबाईल ऍप बनविण्यासाठी किती येतो खर्च? वाचा.. 

परशुराम कोकणे
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

आपली मागणी कशी आहे, त्यानुसार ऍप बनविण्याचा खर्च येतो. ग्राहकांना माहिती देणारे ऍप बनविण्यासाठी किमान 10 हजारांच्या पुढे खर्च येतो. सोलापुरात अनेक तरुणांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून व्यवसायाला सुरवात केली आहे.

सोलापूर : अलीकडे प्रत्येक संस्था, बॅंका, हॉटेल, कंपन्या, शासकीय कार्यालये आपली माहिती देण्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करत आहेत. या माध्यमातून ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन खरेदी, बिल भरणे, जाहिराती, मार्केटिंग या सेवा पुरविल्या जात आहेत. तुम्हीही आपल्या व्यवसायाची माहिती ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी ऍप बनवून घेऊ शकता. आज मोबाईल ऍप्लिकेशनविषयी जाणून घेऊया.. 

हेही वाचा : नोकरीचे आमिष; वाचा कसे फसवले तरुणीला..

आपल्या मागणीनुसार येतो खर्च 
आपली मागणी कशी आहे, त्यानुसार ऍप बनविण्याचा खर्च येतो. ग्राहकांना माहिती देणारे ऍप बनविण्यासाठी किमान 10 हजारांच्या पुढे खर्च येतो. सोलापुरात अनेक तरुणांनी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून व्यवसायाला सुरवात केली आहे. हातातल्या स्मार्टफोनमुळे आता सगळेच सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह असतात. याचाच फायदा घेऊन आपण ऍप्लिकेशन किंवा वेबसाइट बनवून लोकांपर्यंत पोचू शकतो. आपल्या प्रॉडक्‍टची ब्रॅंडिंग करून पैसे मिळवू शकतो. या माध्यमातून लोकांपर्यंत म्हणजे ग्राहकांपर्यंत पोचताना आपला वेळही वाचतो आणि पैसेही मिळतात.

हेही वाचा : मित्राकडे जेवण करून घराकडे निघाला अन्...  

वाढला आहे ऍपचा वापर
वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून ऑनलाइन बुकिंग करणे सोपे झाले आहे. मग ते चित्रपटाचे तिकीट असो, रेल्वे व बस तिकीट किंवा मग कोणत्याही प्रकारची ऑनलाइन सेवा असो. ऍपच्या माध्यमातून आपण आपली ऑनलाइन सेवा थेट विकू शकतो आणि पैसेही मिळवू शकतो. अनेक सेवा घेण्यासोबतच आता ऑनलाइन बिल पे करण्यासाठीही ऍपचा वापर वाढला आहे. विशेष म्हणजे, अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना म्हणजे ऍप वापरणाऱ्यांना गिफ्ट कुपन किंवा कॅशबॅकही दिला जात आहे. 

ऍप्लिकेशन बनवून घेणे म्हणजेच तुम्ही तुमचे प्रॉडक्‍ट किंवा सर्व्हिस ऑनलाइन मार्केटिंग करून पैसे मिळवणे होय. हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग, कॉस्मेटिक प्रॉडक्‍ट, मोबाईल किंवा कॉम्प्युटर ऍक्‍सेसरीज, एज्युकेशन ट्युटोरिअल्स, होम सर्व्हिसेस अशा अनेक जीवनोपयोगी वस्तू, सेवा ऍप्लिकेशनद्वारे विकल्या जात आहेत. आम्ही फूड डिलेव्हरीसह वेगवेगळ्या सेवा देणारे ऍप्लिकेशन बनविले आहे. ऍपच्या माध्यमातून होणाऱ्या ऑनलाइन मार्केटिंगमुळे कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोचता येते. या माध्यमातून अधिकाधिक ग्राहक मिळविता येऊ शकतात. 
- निखिल गुत्तीकोंडा, 
सॉफ्टवेअर डेव्हलपर 

र्भारतात जवळपास 60 करोड इंटरनेट यूजर्स आहेत. ग्रामीण भागातसुद्धा इंटरनेट यूजर्सची संख्या वाढत आहे. होम बेस्ड सर्व्हिसेस म्हणजेच क्‍लीनर, प्लंबर, सुतार, एसी रिपेअर, मसाज, ट्रेनर, मेंटॉर, मेक-अप अशा अनेक घरगुती सर्व्हिस ऑनलाइन ऍप्लिकेशनद्वारे लोकांना देऊन आपण पैसे मिळवू शकतो. आपली मागणी कशी आहे त्यानुसार ऍप बनविण्याचा खर्च आहे. ग्राहकांना माहिती देणारे ऍप बनविण्यासाठी किमान 10 हजारांच्या पुढे खर्च येतो. चार ते पाच दिवसांत ऍप बनवता येते. कोणत्या विषयावर ऍप बनवायचे आहे, त्या विषयाची आधी माहिती घेतली जाते. 
- सागर बिज्जा, 
सॉफ्टवेअर डेव्हलपर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How much does it cost to create a mobile app? Read ..