Sugar Factory Election : सत्ताधारी हुतात्मा पॅनेल पुन्हा सत्तेत; 21-0 ने विरोधी गटाचा उडवला धुव्वा

या निवडणुकीत हुतात्मा पॅनेलचे (Hutatma Panel) सगळे उमेदवार सुमारे तीन हजार मतांच्या फरकाने निवडून आले.
Sugar Factory Election
Sugar Factory Electionesakal
Summary

निवडणुकीत सत्ताधारी हुतात्मा गटाने विरोधी गटाचा धुव्वा उडवला. सत्ताधारी गटाच्या नऊ उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे.

वाळवा : येथील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी (Nagnathanna Naikwadi) हुतात्मा किसन अहिर साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी हुतात्मा पॅनेलने २१-० असा विजय मिळविला. विरोधी गटाच्या सगळ्या उमेदवारांना मोठ्या पराभवाचा धक्का बसला.

Sugar Factory Election
महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या चार केंद्रांना ठोकले टाळे; प्रशासनाची धडक कारवाई, मराठी भाषिकांत संताप

या निवडणुकीत हुतात्मा पॅनेलचे (Hutatma Panel) सगळे उमेदवार सुमारे तीन हजार मतांच्या फरकाने निवडून आले. सुमारे ३९९ मते बाद झाली. वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा गटाने ही निवडणूक लढवली. या कारखान्याच्या बहुतेक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. या वेळीही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी हुतात्मा गटाने प्रयत्न केले.

मात्र, विरोधी गटाला निवडणूक हवी होती. त्यातून २१ पैकी बारा जागांसाठी निवडणूक झाली. निवडणुकीत सत्ताधारी हुतात्मा गटाने विरोधी गटाचा धुव्वा उडवला. सत्ताधारी गटाच्या नऊ उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीनिमित्त वैभव नायकवडी यांच्यासह गौरव नायकवडी, सौ. विशाखा कदम या नायकवडी कुटुंबातील तिघांना संचालक मंडळात संधी मिळाली आहे.

Sugar Factory Election
Loksabha Election : लोकसभेसाठी हसन मुश्रीफांची मोठी घोषणा, पण निर्णय दिल्लीतूनच होणार; असं काय म्हणाले मुश्रीफ?

निवडून आलेल्या संचालक मंडळात वैभव नागनाथ नायकवडी, गौरव किरण नायकवडी, विश्वास बाबूराव थोरात, तुकाराम लक्ष्मण डवंग, शरद बाबासाहेब थोरात, संभाजी शंकर पाटील, पांडुरंग दादू पवार, हणमंत ज्ञानू पाटील, अरविंद जयसिंग कदम, गंगाराम रामचंद्र सूर्यवंशी, लक्ष्मण गणपती शिंदे, रामचंद्र ज्ञानदेव भाडळकर, तानाजी निवृत्ती निकम, बापूसाहेब रंगराव पाटील, शिवाजी रंगराव खामकर, शरद नागू माळी, रामचंद्र हणमंत पाटील, शिवाजी रामचंद्र जावीर, सौ. विशाखा सुरेश कदम, श्रीमती जयश्री जयवंत अहिर, सौ. वैशाली भरत नवले यांचा समावेश आहे.

इस्लामपूर येथे मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गोपाळ मावळे व संभाजी पाटील यांनी काम पाहिले. निकालानंतर वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, वीरधवल नायकवडी, केदार नायकवडी यांची उघड्या वाहनातून दहा किलोमीटर अंतरात इस्लामपूर ते वाळवा अशी मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.

Sugar Factory Election
कोल्हापुरातून बाहेर जाणारे 2 लाख लिटर दूध 'गोकुळ'कडे वळवण्याचे आव्हान; 17 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण!

हुतात्मा किसन अहिर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक गावातील मुख्य मार्गाने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या समाधिस्थळी पोहोचली. तिथे पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा व कुसुमताई नायकवडी यांच्या समाधीला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या प्रांगणात विजयी सभा झाली. वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, बाळासाहेब नायकवडी, नंदकुमार शेळके, विरधवल नायकवडी यांनी भाषणे केली. निकालाच्या पार्श्वभूमीवर आष्टा पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com