Video : हुतात्मा संदीप सावंत यांच्या आठवणीने विजय दिवस चाैक गहिवरला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

हुतात्मा संदीप सावंत यांचे मुंढे (ता. कऱ्हाड) हे मूळ गाव आहे. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पुर्वी सकाळी आठ वाजता त्यांचे पार्थिव कराड येथील विजय दिवस चाैकात आणण्यात आले.

कऱ्हाड : जम्मू- काश्‍मीरमधील नौशेरा येथे नियंत्रण रेषेलगत घुसखोरांसोबत झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेले भारतीय सैन्य दलातील जवान संदीप रघुनाथ सावंत यांचे पार्थिव आज (शुक्रवार) येथील विजय दिवस चाैकात आल्यानंतर नागरीकांनी अमर रहे... अमर रहे... संदीप सावंत अमर रहे अशा घाेषणा दिल्या.
हेही वाचा :  …तर भारताचे लष्कर पीओकेमध्ये हल्ला करेल 

त्यानंतर विजय दिवस चौकातून शोकयात्रा काढण्यात आली. फुलांनी सजवलेल्या टेंपोत त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले हाेते. विजय दिवस चौकातून दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शाहू चौकातून कोल्हापूर नाका ते गोटे येथील नवीन बस थांबा ते मुंढे येथील मराठी शाळेपर्यंत शोक यात्रा पाेहचली.

रस्त्याच्या दुतर्फा नागरिक उभे राहिले हाेते. प्रत्येकाच्या मनात दहशतवाद्यांबाबत चीड हाेती. हमसे जाे टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा...भारत माता की जय... अमर रहे अमर रहे संदीप सावंत अमर रहे अशा घाेषणा देत नागरीक शाेकयात्रेत सहभागी हाेत हाेते.

हेही वाचा : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नौशेरात दोन जवान हुतात्मा 

यावेळी युवकांसह ज्येष्ठ नागरीक देखील माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. ही शाेकयात्रा मुंढे ग्रामपंचायत, चव्हाण मळा मार्गे जवान संदीप सावंत यांच्या घरापर्यंत गेली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hutatma Sandip Sawant Amar Rahe