इचलकरंजी : मोठ्या अपेक्षांचे ओझे घेऊन वाटचाल

राजकीय एकजुटीमुळे मार्ग सुलभ
election of corporation in ichalkaranji political changes possibility in kolhapur
election of corporation in ichalkaranji political changes possibility in kolhapursakal

इचलकरंजी : कोणताही उघड राजकीय विरोध न होता एकमुखी निर्णयातून इचलकरंजी महापालिकेचे स्वप्न साकारत आहे. अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर मतभेद असतानाही या विषयावर मात्र राजकीय एकजूट पाहावयास मिळाली. सक्षम राजकीय पाठपुराव्यामुळे अशक्य अशी वाटणारी गोष्ट अल्पावधीत शक्य झाली आहे, तर यापूर्वी पालिकेच्या कारभाराचा अनुभव नागरिकांना घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका झाल्यावर नागरिकांच्याही मोठ्या अपेक्षा असणार आहेत. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित सर्व यंत्रणांवर असणार आहे.

महापालिका होताना आजही काही प्रश्न निर्माण होत आहेत. काही तांत्रिक अडचणी आहेत. त्यावर पुढील काळात मार्ग काढला जाईल. मुळात महापालिका करण्याचा विषय समोर आल्यानंतर राजकीय विरोध झाला नाही. त्यामुळे महापालिका करण्याच्या कामाला गती आली. अधिसूचना निघेपर्यंत महापालिका सद्यस्थितीला होणे अशक्य असल्याचे मत व्यक्त करण्यात येत होते, मात्र खासदार धैर्यशील माने यांच्या राज्य पातळीवरील सक्षम पाठपुराव्यामुळे इचलकरंजी महापालिका करण्याची संधी लवकर मिळाली. फारसा संघर्ष न करता किमान पाच वर्षे अगोदर महापालिका होत आहे. शहराच्या दृष्टीने ही एक फार मोठी सकारात्मक बाब आहे. पूर्वानुभव पाहता राजकीय श्रेयवादामुळे शहराचे मोठे नुकसान झाले आहे. नळपाणी योजना, आयजीएम हस्तांतर, प्रादेशिक परिवहन विभाग अशा अनेक प्रश्नांवर मतभेद पाहावयास मिळाले आहेत. त्याचा नकळत फटका अनेक घटकांना बसला आहे, पण महापालिकेच्या बाबतीत मात्र वेगळे चित्र पाहावसाय मिळाले. नजीकच्या काळात महापालिका पूर्णत्वास येईल. त्यानंतर इचलकरंजी शहराची वस्त्रोद्योगाशिवाय महापालिका असलेले शहर म्हणून नवी ओळख मिळेल. मुळात महापालिका झाल्याचा कोणताही आर्थिक बोजा नागरिकांवर न पडता शहराच्या नव्या विकासपर्वाला सुरुवात झाल्याचे सकारात्मक चित्र दिसण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिकेचे स्वप्न साकारले असले तरी वास्तवाचे भानही राखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर असणार आहे. त्यादृष्टीने आतापासूनच नियोजनाची गरज आहे. किंबहुना महापालिका झाल्याचे समाधान सर्वांनाच वाटले पाहिजे, अशा रास्त अपेक्षा आहेत.

सध्याची आरोग्य व्यवस्था

सार्वजनिक शौचालय संख्या- ४८

पुरुष सीट- ४९०

महिला सीट- ५१०

पे अॅण्ड शौचालय सुविधा- ३४

कचरा डेपो क्षेत्रफळ (एकर)- १६

नागरी आरोग्य केंद्र- ६

बाह्यरुग्ण विभाग- १

खासगी रुग्णालय- ११०

शहरातील रस्ते दृष्टिक्षेप (किलोमीटर)

सिमेंट काँक्रिट रस्ते- ४४.७६

डांबरी रस्ते- ३५०.२९

खडीचे रस्ते- ४६.०४

इतर रस्ते- ११.२५

एकूण- ४५२.३४

शहराचे भौगोलिक स्थान

शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची ५३९ मीटर (१७६८ फूट) इतकी आहे. शहराची आतापर्यंत दोन वेळा हद्दवाढ झाली. त्यानुसार सध्याचे पालिकेचे कार्यक्षेत्र २७.७० चौरस किलोमीटर इतके आहे; तर मूळ कार्यक्षेत्र २०.३८ चौरस किलोमीटर इतके होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com