सावधान ..! नागरी वस्तीत साप

Ichlkarnji Snake Came From Civilian Settlement
Ichlkarnji Snake Came From Civilian Settlement

इचलकरंजी (काेल्हापूर) : वातावरण व तापमानातील बदल आणि उंदरांचे प्रमाण वाढल्याने भक्ष्याच्या शोधासाठी शेती व निर्जन ठिकाणी असणारे साप आता नागरी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत. यामुळे नागरिकांच्या डोक्‍याला ताप झाला असून भितीचे वातावरण निर्माण झाले.बचावासाठी सर्पमित्रांना पाचारण केले जात असून सर्पमित्र सापांना वनात जावून सोडत आहेत

काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात नागरी वस्तीत सापांचे प्रमाण वाढले आहे. तापमानात झालेले बदल, पावसाची अवेळी हजेरी यामुळे हे साप बाहेर पडताना दिसत आहेत. सध्या ऊस तोडणीचा गळीत हंगामलाही सुरुवात झाल्याने ऊसाच्या फडात असणाऱ्या उंदरांचा शिरकाव ही घराघरांत वाढला आहे.

भक्ष्य शोधत साप नागरी वस्तीत

त्यामुळे भक्ष्य शोधत साप थेट नागरी वस्तीत घर परिसरात पोहोचत आहेत. यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. थंडीचा मौसम ही सुरु झाल्याने थंडगार जमिनीतून बाहेर पडत अनेक साप उष्णतेच्या चाहूलीने रस्त्यावर ठाण मांडत आहेत. यामुळे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांनाही सापांचा त्रास वाढला आहे

साप आढळल्यास  ताबडतोब कळवा

नागरी वस्तीत सापांचे प्रमाण वाढल्याने शहर व परिसरातील सर्पमित्र सतर्क झाले आहेत. सर्पमित्रांचे मोठे जाळे बनले असून साप आढळल्याचे कळताच ताबडतोब सापाला जीवदान देऊन वनविभागाच्या हाती देणे किंवा दाट झाडीच्या वनात सोडले जात आहे. महापूरात नागरी वस्तीतून हजारो सापांना जीवदान देऊन सुरक्षित आश्रय देणारे सर्पमित्र आताही नागरिकांसाठी वरदान ठरत आहेत. साप दिसला की त्याला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांना सर्पमित्र हे साप शेतकऱ्यांचा मित्र व निसर्गचक्राचा भाग असल्याची जाणीव करून देत आहेत

सर्पमित्रांची संख्या वाढली

नागरी वस्तीत साप येण्याचे प्रमाण वाढले आहे. रोजच अनेक ठिकाणाहून नागरिक मदतीसाठी संपर्क करतात. समाजात सर्पमित्रांची संख्या वाढली असून साप आढळल्यास त्वरित पकडून जंगलात सोडून देतो
-शेखर पोवार,सर्पमित्र इचलकरंजी  

या सापांचे वाढले प्रमाण

पाणी आणि भक्ष्याच्या शोधात विविध प्रकारचे साप नागरी वस्तीत आढळत आहेत. घोणस सापाचे प्रमाण जास्त आहे. याचबरोबर धामीण, नाग, मण्यार, फुरसे, धामण, तस्कर, गवत्या, बिनविषारी सर्प अशा अनेक प्रकारच्या सापांना मनुष्य वस्तीतून पकडून सर्पमित्र जीवदान देण्याचे काम करत आहेत.  


नागरिकांना सर्पमित्रांचे आवाहन 

*साप दिसल्यास मारू नका 
*सर्पमित्र,पालिका प्रशासनाशी संपर्क साधा 
*काठी किंवा अन्य मार्गाने सापाला हुसकावू नका 
*सापाच्या ठिकाणापासून दूर उभे रहा 
*दंश केल्यास त्वरित उपचार करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com