
सांगली : न्यायपालिकेत आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरवात झाली आहे. खटल्यांचे अभिलेख (कागदपत्रे) डिजिटलायजेशन करण्याच्या पथदर्शी प्रकल्पास आज प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात प्रलंबित एक लाख १५ हजार खटल्यांची कागदपत्रे आता डिजिटल रुपात केली जाणार आहेत. यातून पैसा आणि वेळेच्या बचतीसह अभिलेख अधिक काळ जतन केले जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सांगली जिल्ह्यात प्रथम हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.