धुक्‍यामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव

सुधीर पठारे
बुधवार, 15 जानेवारी 2020

मागील वर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. यंदा काही कांदाउत्पादकांना उच्चांक बाजारभाव मिळत आहे. त्यात अवकाळी पावसाने कांद्याचे रोप गेले. त्यामुळे कांद्याच्या रोपांना एका एकराला लागणारे रोप पस्तीस ते तीस हजाराला घ्यावे लागत आहे. 

निघोज (पारनेर) : निघोज, जवळे, राळेगण थेरपाळ, कोहकडी, अळकुटी, कळस, पाडळी आळे, गारखिंडी, दरोडी, रांधे, म्हस्केवाडी, चोंभूत, शिरापूर, पाबळ या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा पीक घेतले जाते. धुक्‍यामुळे कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

ठळक बातमी- शाळांसाठी रोटरी उभारणार "व्हर्चुअल क्‍लासरुम'  

मागील वर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. यंदा काही कांदाउत्पादकांना उच्चांक बाजारभाव मिळत आहे. त्यात अवकाळी पावसाने कांद्याचे रोप गेले. त्यामुळे कांद्याच्या रोपांना एका एकराला लागणारे रोप पस्तीस ते तीस हजाराला घ्यावे लागत आहे. 

धुक्‍याचे प्रमाण वाढले

सध्याच्या घडीला धुक्‍याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा पिकावर धुक्‍याचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांदा पिकाला जगविण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. धुके जास्त प्रमाणात पडत असल्याने शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात धुके पडत असल्याने सध्या कुकडी डाव्या कालव्याला व ओढ्या-नाल्यांना पाणी चालू असल्याने धुक्‍याचे प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे.

हेही वाचा- शनिशिंगणापुरात लटकू बंदचा निर्णय फत्ते

औषधांच्या दुकानांमध्ये गर्दी

वाढत्या धुक्‍यामुळे कांद्याचे पीक जाण्याच्या मार्गावर आहे. कांद्यावरील करपा व माव्यामुळे रासायनिक औषधे फवारणी करण्यासाठी दोन ते तीन हजार रुपये एका फवारणीला खर्च येतो. त्यामुळे रासायनिक औषधांच्या दुकानांमध्ये गर्दी होत आहे. कांदा पीक काढणीला येईपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडते का, अशी भीती कांदाउत्पादकांना वाटू लागली आहे. 

आर्थिक स्थिती बिकट

सुरवातीला अवकाळी पावसाने कांद्याचे रोप गेले. त्यानंतर तीस हजार रुपयांपर्यंत कांद्याचे रोप घेऊन कांदा लागवड केली. जेवढा खर्च संपूर्ण काढणीला येतो, तेवढाच खर्च आजपर्यंत होऊन बसला आहे आणि अजून कांदा शेतातच आहे. आता धुक्‍याचा प्रादुर्भाव होत असल्याने रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. 
- चंद्रकांत शेटे, शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Influence of diseases on the onion crop due to fog