आंतरजातीय विवाहात का होतेय घट...?

आंतरजातीय विवाहात का होतेय घट...?

बेळगाव - चिक्कोडी तालुक्‍यात आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्यावर्षी केवळ ७२ आंतरजातीय विवाहाची नोंद शासन दरबारी झाली आहे. पाच वर्षांत तालुक्‍यातील ५१४ युवक-युवतींचे आंतरजातीय विवाह झाले आहेत.

आंतरजातीय विवाह केल्यानंतर संबंधित दांपत्यासमोर अनेक अडचणी उभ्या राहतात. तसेच घरातून बाहेर काढण्याचे प्रकारही घडत आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी अशा विवाहांची संख्या वाढलेली होती; पण दोन-तीन वर्षांत ती कमी झाल्याचे समाजकल्याण विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे. २०१८ मध्ये १३२ तर २०१९ मध्ये केवळ ७२ विवाह झाल्याची नोंद आहे.

गतवर्षी केवळ ७२ रेशीमगाठी

आंतरजातीय विवाह केलेल्या दांपत्यांना समाजकल्याण विभागाकडून पूर्वी मंगळसूत्र आणि संसारोपयोगी साहित्य दिले जात. त्याऐवजी आता पन्नास हजारांची मदत केली जात आहे. तसेच केंद्र शासनाकडून अडीच लाखांची मदत मिळते, मात्र त्यासाठी प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवावा लागतो. त्याचा लाभ मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यासाठी समाज कल्याण विभागाने पुढाकार घेऊन जागृतीवर भर दिल्यास अशा दांपत्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.
योजना कोणासाठी ?

तालुक्यात पाच वर्षांत ५१४ जणांचा संसार

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व भटक्‍या विमुक्त जमाती अशा संवर्गातील एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौद्ध, शिख यापैकी दुसरी व्यक्ती यांनी विवाह केल्यास त्यास आंतरजातीय विवाह संबोधण्यात येते. यासोबतच अनुसूचित जाती, जमाती, भटक्‍या विमुक्त जमाती यातील अंतरप्रवर्गात विवाह करणाऱ्यांनाही ही योजना लागू आहे.

आंतरजातीय विवाहामध्ये अलीकडच्या काळात वाढ झाली असली तरी नोंदणी करणाऱ्यांची संख्या कमी आहे. मागासवर्गीय मुलगी असेल तर तीन लाख रुपये व मुलगा असेल तर अडीच लाख रुपये शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यासाठी अशा विवाह करणाऱ्या जोडप्यांना वर्षाच्या आत समाजकल्याण खात्याकडे नोंदणी करणे आवश्‍यक आहे, पण ही नोंदणी होत नसल्याने अनुदान देणे कठीण बनते.
- मल्लिकार्जुन उळेगड्डी, समाजकल्याण अधिकारी, चिक्कोडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com