आंतरशालेय नाट्य स्पर्धांना 29 जानेवारीपासून प्रारंभ 

drama compition begin on january29
drama compition begin on january29
Updated on

नगर : सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन) उपक्रमांतर्गत भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये 29 व 30 जानेवारीला आंतरशालेय नाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अभिनय व संवादकौशल्याला वाव मिळावा, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम मुदत शनिवारपर्यंत (ता. 25) आहे. 

सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा होत आहे. नगर जिल्ह्यातील पाचवी ते दहावीतील 15 वर्षांपर्यंतचे विद्यार्थीच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. स्पर्धेसाठी एकच गट असून, सहभागी शाळांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत नाटिका सादर करता येईल. "आय लव नगर' व "लेट्‌स अप'ने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन संघांना सन्मानचिन्ह व अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व एक हजार रुपये, अशी सांघिक बक्षिसे देण्यात येतील.


वैयक्तिक पातळीवरही अभिनय, दिग्दर्शन व नेपथ्यासाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रे देऊन सन्मानित केले जाईल. नाटिकेचा विषय, आशय, दिग्दर्शन, नेपथ्य, अभिनय या निकषांवर स्पर्धेचे गुणांकन करण्यात येईल. सहभागी संघाची जाण्या-येण्याची, भोजनाची, तसेच इतर सर्व व्यवस्था संबंधित विद्यालयांची असेल. संपर्क : शिल्पा धोपावकर 9890611291. 

स्पर्धेसाठी... 
- स्पर्धा संयोजनाचे सर्वाधिकार "सकाळ एनआयई'कडे आहेत. 
- एका संघातील विद्यार्थ्यांची संख्या 15पेक्षा जास्त नसावी. 
- नाटिका सादरीकरणाचा कालावधी 20 मिनिटे, तर नेपथ्य संयोजनासाठी 10 मिनिटे वेळ असेल. 
- नाटिका सादरीकरणासाठी विषयाची अट नाही; पण सामाजिक, धार्मिक व भावनिक तेढ निर्माण करणारे विषय टाळावेत. 
- परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत परीक्षक अथवा संयोजकांशी चर्चा करू नये. 
- स्पर्धेसाठी नावनोंदणी आवश्‍यक असून, प्रत्येक नाटिकेस 50 रुपये प्रवेशशुल्क आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com