इस्लामपुर : 'त्या' विवाहितेचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच!, पतीनेच केला घात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news in islampur

इस्लामपुर : 'त्या' विवाहितेचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच!, पतीनेच केला घात

इस्लामपूर : येथील कोळी मळा परिसरातील विवाहिता राजनंदिनी सरनोबत यांचा काल विहिरीत पाय घसरल्याने पाण्यात बुडून झालेला मृत्यू हा अपघाती मृत्यू नसून तो खून असल्याचे उघडकीस आले आहे. काल (ता. १९) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. काल रात्री उशिरा राजनंदिनी हिचा पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (वय २९, रा. कोळी मळा, इस्लामपूर) याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राजनंदिनी यांच्या माहेरचे नातेवाईक मिलिंद नानासाहेब सावंत (वय २६, रा. रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: तुमचा ऑफिस लुक परफेक्ट बनवण्यासाठी काही खास टिप्स; आत्मविश्वासही वाढेल

घटनेची व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजनंदिनीला पहिल्या दोन्ही मुलीच झाल्याचा राग कौस्तुभच्या मनात होता. एक मुलगी दोन ते अडीच वर्षांची तर दुसरी मुलगी अवघी सहा महिन्यांची आहे. या रागातून कौस्तुभ याने रविवारी (ता. १८) पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जाण्याचा बहाणा करत पत्नीला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्याच्या दिशेने घेऊन गेला. कापूसखेड गावच्या हद्दीत रस्त्यापासून ३० ते ४० फूट अंतरावर असलेल्या एका शेतात नेले.

तेथे संदीप पाटील व विनायक पाटील यांच्या सामायिक मालकीच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत राजनंदिनीला ढकलून दिले. तिला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल पोलिसांत माहिती देताना मात्र हा मृत्यू लघुशंकेसाठी विहीर परिसरात गेल्यानंतर पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याचे कौस्तुभ याने पोलिसांना सांगितले होते. राजनंदिनी यांच्या नातेवाईकांनी मात्र हा घातपात असल्याची शंका व्यक्त करत पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणी कालपासूनच लावून धरली होती. उत्तरीय तपासणीनंतर तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा: Sangli Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; जिल्ह्यातील निमसोडच्या तरुणावर गुन्हा

Web Title: Islampur Crime Case Married Woman Murdered For Her Husband Death By Accidental

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..