इस्लामपूर पाणी पुरवठा योजनेची श्वेतपत्रिका जाहीर !

प्रशासक वैभव साबळे; वर्षात साडे तीन कोटींचा तोटा, दरवाढ अनिवार्य!
वैभव साबळे
वैभव साबळेsakal

इस्लामपूर: चालू वर्षात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला सुमारे तीन कोटी ३८ लाख ७५ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. हाच तोटा गेल्या १० वर्षात सुमारे २० कोटींच्यावर झाला आहे. पाणीपट्टी दरवाढ अनिवार्य आहे; अन्यथा येत्या काळात गंभीर समस्येला सामोरे जावे लागेल असा इशारा मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री. साबळे यांनी आज पाणीपुरवठा विभागाची श्वेतपत्रिका जाहीर करत आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांवरही भाष्य केले.

वैभव साबळे
Jhund Movie : सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळे यांच्यासाठी खास पोस्ट | Sakal Media |

ते म्हणाले, "शहराची लोकसंख्या सुमारे ९० हजार आहे. प्रतिव्यक्ती रोज १३५ लिटर पाणी पुरवण्यासाठी १२.५ दशलक्ष लिटर पाणी लागते. त्यासाठी १६ पाणी टाक्या आवश्यक आहेत; मात्र सध्या फक्त ७ टाक्या आहेत. यातीलही तीन टाक्यांचे कार्यक्षम वयोमान संपले आहे. पंपिंग मशीनरीचेही वयोमान संपले आहे. आपण कालबाह्य यंत्रणा वापरून पाणी पुरवठा करत आहोत. गेल्या वर्षात पाणी पुरवठा योजनेवर सुमारे ६ कोटी ४१ लाख ९५ हजार रुपये खर्च केलेत तर त्यातून उत्पन्न फक्त तीन कोटी ३ लाख २० हजार रुपये मिळाले आहे. घरगुती १२५४८, शासकीय १३१ तर व्यावसायिक २९४ कनेक्शन आहेत. शेजारील नगरपालिका, नगरपंचायत आणि मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीच्या तुलनेत इस्लामपुरात जास्त वेळ आणि ज्यादा पाणी पुरवले जाते. पालिकेने शेवटची पाणीपट्टी वाढ २००६ साली केली होती. त्यानंतर १७ वर्षे तोच दर लागू आहे. पाणी पुरवठा तोट्यात असल्याने काही उपाययोजना कराव्या लागणार आहेत. शासनाकडून चोवीस बाय सात पाणी योजना मंजूर करून घ्यावी लागेल, मात्र त्यासाठी १५ टक्के स्वहिस्सा भरण्यासाठी लागणारी रक्कमही पालिकेकडे नाहीय. पुरवठा ना नफा ना तोटा चालवण्यासाठी ठिकठिकाणी झालेली गळती तंत्रज्ञानाने शोधणे व दुरुस्ती करणे, पाणी चोरी शोधून त्यांच्यावर कारवाई करणे, आधुनिक मीटर प्रणाली बसवणे व मोजणीनुसार पाणीपट्टी आकारणे, थेट पाईपलाईनला मोटार जोडणीला बंदी घालणे, दर सुधारित करून वर्षाला किमान चार हजार रुपये आकारणी करणे, जास्त वापर जास्त दर तत्त्वाची अंमलबजावणी करणे, अनधिकृत मालमत्तांचा पाणी पुरवठा खंडित करणे यासारख्या गोष्टी कराव्या लागतील. जिल्हास्तरावरून येणारा शासनाचा निधी इतर कामापेक्षा जर यावरच खर्च होत असेल तर हे दुर्दैवी आहे.

वैभव साबळे
Kolhapur : नदी प्रदूषण थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी दिल्या 'या' सूचना

पाचशे कनेक्शन अनधिकृत!

शहरातील दुःखद प्रसंगांना मोफत टँकर पाणी देण्यासाठी सुमारे १६ लाख रुपये खर्च होतात. शहरात किमान ५०० कनेक्शन अनधिकृत आहेत, सध्या आमची यंत्रणा मार्च अखेर वसुलीत अडकलीय, लवकरच अनधिकृत नळ कनेक्शनधारकांवर कारवाईची मोहीम हाती घेणार असल्याचे श्री. साबळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com