

Jayant Patil devendraFadnavis meeting
esakal
Jayant Patil statement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची भेट पूर्वनियोजित होती आणि ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या विषयावर चर्चा करण्यासाठीच आपण वर्षा बंगल्यावर गेलो होतो. असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.