"...तर प्रॉब्लेम होतात"; जयंत पाटलांचा नितीन गडकरींसमोर पडळकरांना टोला

नितीन गडकरींसमोर जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
Jayant Patil
Jayant PatilTeam eSakal

सांगली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात झालेल्या विकास कामांचं लोकार्पणाचा सोहळा आज सुरु आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उभारलेल्या २३३४ कोटी रुपये किमतीच्या ९६.७८ किमी लांबीच्या महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होतंय. या प्रकल्पाच्या लोकार्पणास जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या गोपीचंद पडळकरांना जयंत पाटील यांनी मिश्किल शैलीत टोला लगावला.

Jayant Patil
LIVE : सोमय्यांना पोलीस रोखणार? दापोली पोलीस ठाण्यात हालचालींना वेग

जयंत पाटील यांनी यावेळी नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतूक केलं. सर्व भारतात समान दर्जाचे रस्ते होत आहेत, वेगवान रस्ते होत आहेत. सांगली जिल्ह्यातील रस्ते चांगले झाले, त्यांचं श्रेय खासदार संजय पाटील यांच्या मार्फचत नितीन गडकरींना जातं असं ते म्हणाले. तसंच पुढे जयंत पाटील म्हणाले की, पडळकर साहेब जी कामं चांगली केली असतील त्यांना चांगलं म्हणावं लागेल.

Jayant Patil
"ST कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगा एवढा पगार मिळेल, संप मागे घ्या"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com