Jayant Patil Gopichand Padalkar verbal clash
esakal
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यात कट्टर राजकीय विरोधक आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील एकाच व्यासपीठावर आले. बावची येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली. शिवरायांच्या इतिहासाचा दाखला देत दोघांनीही एकमेकांवर राजकीय टोलेबाजी केली. त्यामुळे लोकार्पण सोहळ्याला चांगलाच राजकीय रंग (Jayant Patil Afzal Khan statement) चढला.