

जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदललं
esakal
Sangli Political News : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अचानक रात्रीतून नाव बदलल्याने खळबळ उडाली आहे. काही अज्ञातांकडून कारखान्याच्या स्वागत कमानीवर 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना' असं नवीन नाव लावले आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.