esakal | Women's Day भरकटलेल्या मुलींना पाेलिसांनी दिली उर्जा
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Day भरकटलेल्या मुलींना पाेलिसांनी दिली उर्जा

पिडीत मुलीचा महिला दिनाचे औचित्य साधून तिच्या कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे कल्पनेतून कराड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थिती तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Women's Day भरकटलेल्या मुलींना पाेलिसांनी दिली उर्जा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड :  कडेगांव तालुक्यातील दोन अल्पवयीन मुली शुक्रवारी किरकोळ वादाच्या कारणावरून राहात्या घरातून निघून गेल्या होत्या. त्या मुलीं मलकापूर (ता.कऱ्हाड) येथील डीमार्टमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याने कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारी वरून पोलीसांनी दोन्ही मुलीचा शोध घेतला. अत्यंत गांभीर्याने तपास करून केवळ १३ तासांचे आत मिरज येथून ताब्यात घेतल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी :  कडेगांव तालुक्यातील दोन अल्पवयीन मुली या शुक्रवारी घरात झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरुन दुपारी एकच्या सुमारास त्यांचे राहत्या घरातून निघून गेल्या होत्या. त्या मुली मलकापूर येथील डी - मार्ट येथे गेल्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होत्या. संबधित मुलींचा कोणीतरी अज्ञातपणाचा फायदा घेवून पळवून नेल्याच्या तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीचा तपास पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील यांचेकडे सोपविण्यात आला होता. याबाबत कोणत्याही प्रकारची काही एक पुरावा प्राप्त नव्हता. सदर दोन्ही मुलीकडे मोबाईल नसल्याने तपास करणे अवघड होते. मुलींच्या शोधासाठी पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, पोलीस निरीक्षक एम.एस.सराटे यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील व हवालदार सतिश जाधव , भुताळे,  गोसावी, वसीम संदे तसेच चालक पाटील हे मिरज येथे गेले. तेथुन दोन्ही मुलीचा शोध घेवून १३ तासांचे आत त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला. त्यांना शनिवार (ता.7) सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.     

अन पोलीस ठाण्यात झाला वाढदिवस

एका पिडीत मुलीचा आज (शनिवारी) वाढदिवस होता. उद्या होणा-या महिला दिनाचे औचित्य साधून तिच्या कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे कल्पनेतून कराड शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थिती तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
 
हेही वाचा : Video : देखा उसे जब आँख भरके रहे गये... उपजिल्हाधिकारी मोनिका सिंह

वाचा : Video : ग्रेट; साठीतीही शोभाताई शिकल्या दुचाकी चालवायला

नक्की वाचा : Video : संघर्ष उषाताईंचा जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी