Video : कर्नाटकची महाराष्ट्रावर 'दादागिरी'

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

एसटीच्या चालकाची काॅलर पकडून विजापूरच्या अधिकाऱयाने अरेरावी केल्याने प्रवाशांसह नागरीकांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

सातारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मेढा - विजापूर बस ही नियमीत विजापूरला जाते. गुरुवारी (ता. 20) ही बस विजापूरला पोहचली. विजापूर बसस्थानकावरील फलाटावर चालकाने परतीच्या प्रवासासाठी बस उभी केली. त्यामध्ये प्रवासीही बसले होते. काही वेळातच बसमध्ये कर्नाटक परिवहन महामंडळाचा अधिकारी बसमध्ये चढले. त्यांनी चालकास येथे बस का लावलीस ? असे म्हणून चालकाची कॉलर धरुन त्यास खाली खेचण्याचा प्रयत्न केला. 

या घटनेचे पडसाद प्रवाशांत उमटले. प्रवाशांनी अधिकाऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या अधिकाऱ्याने ना चालकाची कॉलर सोडली ना प्रवाशांचे ऐकले. त्याचे म्हणणे एकच होते. खाली उतर. साहेबांकडे चल. परंतु चालकाने मला सोडा मी येताे साहेबांकडे येतो अशी विनवणी केली. चालकाने मात्र स्टेअरींग न सोडताच तेथेच बसून राहिला. त्यावेळी बसमधील महिला वाहक देखील संबंधित अधिकारी यांना समाजावून सांगत हाेती.  
या घटनेचा व्हिडिओ काही प्रवाशांनी काढला होतो. तो व्हायरल झाला. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 

चालक, वाहकांसह नागरीकांत संताप

दरम्यान या घटनेची माहिती तसेच व्हिडिओ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक तसेच कर्मचारी संघटनेपर्यंत पोहचली. या घटनेची माहिती नागरीकांमध्ये देखील समाजमाध्यमातून पोहचली. परिणामी आपल्या भागातील चालकास कर्नाटकच्या अधिकाऱ्याने दिलेली अपमानास्पद वागणुकीमुळे सामान्य नागरीकांतही असंतोष निर्माण झाला.
 

गडहिंग्लजमध्ये उमटले पडसाद

वास्तविक कर्नाटक परिवहन महामंडळाच्या शेकडो बस महाराष्ट्रातील बसस्थानाकात राजरोस ये-जा करीत असतात. त्यांना कोणीही त्रास देत नाही. अटकाव करीत नाही. त्यामुळे कर्नाटक परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली वागणुक जिव्हारी लागली. त्यामुळेच गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) बसस्थानाकात उभ्या असलेल्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्या शुक्रवारी (ता.22) पहाटे तीन वाजता बसस्थानकाच्या बाहेर काढण्यास भाग पाडले.

या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी सातारा विभाग नियंत्रकांना माेबाईलवरुन संपर्क साधला असता त्यांचा माेबाईल एक रिंगवाजून कट हाेत हाेता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka's 'Dadagiri' on Maharashtra