अपहृत बालिकेची चोवीस तासांत सुटका; मलाड येथून संशयित महिलेला अटक

kidnapped girl found in 24 hours; Suspected woman arrested from Malad
kidnapped girl found in 24 hours; Suspected woman arrested from Malad

शिराळा (जि. सांगली) : शिराळा येथील बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी पूजा ऊर्फ स्वाती स्वप्नील कांबळे (वय 23, रा. पारगाव, जि. कोल्हापूर, सध्या रा. इंगरुळ, ता. शिराळा) या संशयित आरोपी महिलेस शिराळा पोलिसांनी 24 तासांत मालाड (मुंबई) येथे अटक करून अपहरण झालेल्या मुलीची सुटका केली. याबाबत आरती पांडुरंग धुमाळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

शिराळा पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, काही दिवसांपूर्वी संबंधित कुटुंबाशी संशयित आरोपी स्वाती कांबळे हिच्या बरोबर ओळख झाली होती. बुधवारी (ता. 18) रोजी सकाळी 11 च्या सुमारास मोबाईलवर स्वातीचा फोन आला व तिने मुलीच्या आईला सांगितले की, "मी तुमच्या घराबाहेर आहे, घरात येणार आहे. तुमच्या मुलीला गेटची कडी काढण्यासाठी बाहेर पाठवून द्या' 

त्यानुसार मुलीला गेट उघडण्यासाठी पाठवून दिले व ती मोबाईल घेऊन बाहेर गेली. बराच वेळ झाला तरी मुलगी घरात परत आली नाही आणि स्वातीही आली नाही म्हणून बाहेर जाऊन पाहिले असता, त्या दोघीही घराबाहेर दिसून आल्या नाहीत. यावेळी त्यांच्या मुलाने मुलीला स्वाती गेटवरून सोबत घेऊन गेली आहे, असे सांगितले.

त्यानंतर मुलीच्या व स्वातीच्या मोबाईलवर फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचे मोबाईल बंद असल्याने संपर्क झाला नाही. घराचे शेजारी तसेच शिराळा, इंगरूळ येथेही शोध घेतला; परंतु त्या दोघीही कोठेही सापडल्या नाहीत. त्यानंतर फिर्याद दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी चौकशी करुन तसेच तांत्रिक मुद्यांच्या आधारे माहिती घेऊन तपास पथक मालाड मुंबई येथे पाठवले.

तेथील झोपडपट्टीमध्ये सदर संशयित पूजाला अटक करून अपहृत बालिकेची सुटका केली. यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, बी. जी. कुंभार, डी. एच. नायकल, एस. आर. पाटील, व्ही. जे. नांगरे, एम. एस. कुंभार व सायबर पोलीस ठाण्याचे एस. आर. पाटील, पी. एस. पाटील यांनी प्रयत्न केले. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com