Land Encrochment : किल्लेमच्छिंद्रगड येथील ५३० गुंठे गायरानावर बाहुबली नेत्याने केले अतिक्रमण; प्रशासन मात्र सुस्त

किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील मोफत गुरेचरण क्षेत्र गट नंबर २५४ मध्ये ५ हेक्टर ३० आर (५३० गुंठे) क्षेत्रावर एका खासगी संस्थेने संपूर्ण अतिक्रमण केले आहे.
Killemachindragad
Killemachindragadsakal

किल्लेमच्छिंद्रगड - सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड आणि सांगली जिल्यातील वाळवा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) गावच्या हद्दीतील मोफत गुरेचरण क्षेत्र गट नंबर २५४ मध्ये ५ हेक्टर ३० आर (५३० गुंठे) क्षेत्रावर एका खासगी संस्थेने संपूर्ण अतिक्रमण केले आहे. संस्थेकडून बिगर शेती कारणासाठी या क्षेत्राचा वापर होत असल्याने आजच्या बाजार भावानुसार या क्षेत्राची किंमत सुमारे पंचवीस कोटी रुपयाहून अधिक होते.

अतिक्रमित जमिनीचे बळकावलेले क्षेत्र परत मिळविण्यासाठी सदरच्या क्षेत्राची २०११ मध्ये मोजणी करण्यात आली. अतिक्रमण दूर करण्यासाठी पुढाकार घेवून 'हत्तीसंगे दांडू कुणी खेळायचा.. या राजकिय भितीने गेल्या बारा वर्षात सत्तेवर आलेल्या पदाधिकाऱ्यांनी 'आपले पद भले आणि आपण भले' या भुमिकेतून घडल्या प्रकाराकडे कानाडोळा केला. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीचे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची नागरीकांमधून मागणी आहे.

दहा वर्षापुर्वी सदर जागेची मोजणी होवून खासगी संस्थेने अतिक्रमण केल्याचे सिध्द झाले असता आपले राजकिय संबंध जोपासण्यासाठी तसेच तथाकथीत नेत्याच्या संस्थेतील आपले स्थान टिकविण्यासाठी एकाही कार्यकर्त्यांने होत असलेल्या प्रकाराविरोधात आवाज उठविण्याचे धाडस दाखविलेले नाही.

त्यामुळे कऱ्हाडचा तथाकथित बाहुबली राजकिय नेता गट नंबर २५४ मधील क्षेत्रावर व्यवसायीक इमारतींचे बांधकाम करून तसेच इतर अव्यवसायीक कारणासाठी सदर मिळकतीचा वापर करून संपुर्ण गायरान क्षेत्र गिळंकृत करण्याच्या तयारीस लागला असल्याचे दिसून येते.

कोणत्याही गावच्या गायरान क्षेत्राची देखभाल ग्रामपंचायतीकडे असते. ग्रामपंचायतीकडून गावच्या स्थावर मिळकतीचे रक्षण करण्यात उणीव होत असल्यास संबंधित प्रश्नी पुणे येथील विभागीय आयुक्त (ग्रा.पं. विभाग) यांचेकडे कोणीही नागरीक तक्रार दाखल करून कैफियत मांडू शकतो.

चौकशीअंती आयुक्तांना गावच्या मिळकतीवर अतिक्रमण झाल्याचे दिसून आल्यास, सिद्ध झाल्यास संबंधिताविरोधात ते रितसर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण केलेले क्षेत्र परत गावास मिळवून देवू शकतात. याबाबत ग्रामपंचायतीकडे माहिती घेतली असता संबंधीत क्षेत्राची मोजणी होऊन बराच कालावधी लोटला असल्याने नव्याने मोजणी करवून घेवून अतिक्रमण झालेले क्षेत्र ताब्यात घेतले जाईल असे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com