उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होणाऱ्या गावांची  समस्या  होणार लवकरच दुर

मिलिंद देसाई
Friday, 19 February 2021

पाठबंधारे विभागाने किणये गावाजवळ 80 कोटी रुपयांच्या अनुदानातून मंगेत्री नदीवर धरण बांधण्याचे काम हाती घेतले आहे.

बेळगाव : मोठ्‌या प्रमाणात पाऊस पडून देखिल उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होणाऱ्या किणये आणि परिसरातील गावांची पाण्याची समस्या लवकरच दुर होणार आहे. किणये येथे बांधण्यात येत असलेल्या धरणाचे काम मे महिन्यापर्यंत पुर्ण करण्याच्या सुचना पाठबंधारे विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जुन महिन्यात धरणाचे उदघाटन होण्याची शक्‍यता आहे. 

पाठबंधारे विभागाने किणये गावाजवळ 80 कोटी रुपयांच्या अनुदानातून मंगेत्री नदीवर धरण बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या धरणाची क्षमता 0.113 टिएमससी इतकी असून धरणामुळे किणयेसह किणये, खादरवाडी, रणकुंडे 
वाघवडे व संतीबस्तवाड येथील गावांना पाणी उपलब्ध होणार आहे. जांबोटी, किणये आदी भागातील शेतकरी पारंपारीक पध्दतीने शेती व्यवसाय करीत असतात.

या भागात अनेक लहान मोठे तलाव आहेत. परंतु उन्हाळ्यात या भागात पाण्याची समस्या निर्माण होत असते. याची दखल धरणाचे काम हाती घेण्यात आले असून सध्या 50 एकर जागेत धरणाचे बांधकाम केले जात आहे. 
या भागात दरवर्षी सरासरी 1638.16 मिली मिटर पावसाची नोंद हो. यापैकी 50 टक्‍के पाण्याचा साठा धरणामध्ये होणार आहे. 

हेही वाचा- 1970 च्या दशकातील उद्योगांची ही आहे अवस्था

धरणाच्या दोन्ही बाजुने कालवे काढण्यात येणार असून डाव्याबाजुकडील कालव्याची उंची 4.23 तर उजव्या बाजुच्या कालव्याची उंची 6.19 फुट इतकी असून कालवे निर्माण करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची 179 एकर जमिन भु संपादीत करण्यात आली आहे. यापैकी 149.31 एकर जमिनीच्या भु संपादनाची रक्‍कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तर 30.31 एकर जमिनीच्या भु संपादनाची रक्‍कम शेतकऱ्यांना देणे बाकी असून ही रक्‍कम वेळेत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे. 

पालक मंत्री रमेश जारकीहोळी यांनी धरणाच्या कामाची पाहणी करुन काम वेळेत पुर्ण करण्याच्या सुचना कंत्राटदाराला केल्या आहेत. त्यानुसार रात्रदिंवसस काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरपर्यंत धरणाचे काम पुर्ण करुन धरणाचे उदघाटन करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे.

संपादन -अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kinaye Dam work on will be completed by May dam marathi news belgaum