ब्रेकिंग - अखेर अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद...

kolhapur Ambai Temple closed  kolhapur marthi news
kolhapur Ambai Temple closed kolhapur marthi news
Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आज रात्रीपासून भाविकांसाठी बंद करण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंदच राहणार असून, मंदिरातील नित्य पूजा व सर्व धार्मिक विधी सुरूच राहणार आहेत. त्यासाठी मोजकेच देवस्थान समितीचे कर्मचारी आणि पुजारी मंदिरात उपस्थित असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. दरम्यान, आज रात्री शेजारतीनंतर मंदिराचे चारही प्रमुख दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात आले.

 
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मंदिरात विशेष खबरदारी घेण्यात आली होती. चारही प्रमुख दरवाजांतून प्रवेश करणाऱ्या भाविकांच्या हाताला सॅनेटायजर लावूनच प्रवेश दिला जात होता. त्याशिवाय, मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे सक्तीचे केले होते. मात्र, तरीही भाविकांची संख्या मात्र दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने दर्शन बंद न करण्याचा निर्णय काल (ता. १६)पर्यंत घेण्यात आला.  
मात्र, आजच्या बैठकीनंतर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचे ठरले. देवस्थान समितीच्या अखत्यारीतील ओढ्यावरील सिद्धिविनायक, दत्त भिक्षालिंग आदी सर्वच मंदिरे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत. 

हेही वाचा- पोलिस पाटील ठेवणार गावातील परिस्थितीवर लक्ष ​

अंबाबाई मंदिरातील भाविकांची संख्या अशी 
० १ मार्च : सात हजार ८५०
० ४ मार्च : सात हजार ८०४
० ८ मार्च : सात हजार ४२१
० १० मार्च : सहा हजार ७४०
० १२ मार्च : चार हजार ३७२
० १४ मार्च : दोन हजार ७४८
० १५ मार्च : एक हजार ३६९
० १६ मार्च : एक हजार १६४
 हेही वाचा- आमदार वैभव नाईक का म्हणाले सतर्क राहा? ​
देवस्थानची सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व मंदिरे पुढील सूचना येईपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहेत. देवस्थान समितीच्या स्थानिक उपसमित्या, पुजारी व देवस्थान समितीच्या संबंधित सर्व घटकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी केले आहे. 

 हेही वाचा- दुर्दैवी! वेळीच वनखाते पोचले असते तर.... ​

महालक्ष्मी अन्नछत्रही बंद
अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद झाल्यावर आता महालक्ष्मी अन्नछत्रही पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्नछत्राचा रोज तीन हजार ते आठ हजारांवर भाविक लाभ घ्यायचे. मात्र, गेल्या आठ दिवसांत ही संख्या एकदम कमी होऊन ४०० ते ५०० वर आली असल्याने उद्या (ता. १८)पासून अन्नछत्र बंद ठेवले जाणार आहे. मात्र, शिवभोजन उपक्रम सुरूच राहणार असल्याचे अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले.

अंबाबाईचे दर्शन २८ वर्षांनी बंद
अंबाबाई मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी असली तरी देवीचे सर्व नित्य पूजाविधी सुरूच राहणार आहेत. पहाटे पावणेपाचला घंटानाद होऊन मंदिर उघडले जाईल. पाच वाजून दहा मिनिटांनी आरती, तर साडेआठला स्नान आणि पूजा होईल. साडेनऊला आरती आणि नैवेद्य, साडेअकराला.. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com