esakal | 'त्याच्यासाठी' त्यांनी रस्त्यावरच केले जेवण
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur carrier federation protest on road.gif

रस्त्यांच्‍या दुरवस्‍थेवरून वाहनधारक महासंघातर्फे महापालिकेचा निषेध

'त्याच्यासाठी' त्यांनी रस्त्यावरच केले जेवण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : खराब रस्त्यांच्या प्रश्‍नावरून जिल्हा वाहनधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज रस्त्यावरच खर्डा-भाकरी खाऊन प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

हे पण वाचा - कोल्हापूर झेडपीत अखेर सत्तांतर, काॅंग्रेसने डाव जिंकला

महिन्यापासून वाहनधारक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलन सुरू केले आहे. रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. मध्यंतरी महापालिकेला गाड्यांचा घेराओ घालून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले गेले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पापाची तिकटी, पुढे गंगावेसपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चप्पल लाईनचे व्यापारी धुळीने त्रस्त झाले आहेत. गंगावेसपर्यंत रस्त्याची अशीच स्थिती आहे. नववर्षाचे स्वागत होत असताना वाहनधारक महासंघाने मात्र खड्ड्याभोवती रांगोळी काढून, भोवती फुले टाकून आंदोलन केले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

हे पण वाचा - अफलातून ; ऊसतोड मजूर छायाताईंची काव्यप्रतिभा

कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले, अभिषेक देवणे, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, नीलेश हंकारे, राजू नागवेकर, भारत चव्हाण, पुष्पक पाटील, विनोद जाधव, अतुल भास्कर, दत्ता कोतमिरे, सोमेश ओतारी, प्रज्वल गवळी, गणेश डोईफोडे आदी सहभागी झाले.

loading image