
Police and protesting milk producers clash outside Gokul Dairy office in Kolhapur as agitators attempt to enter premises with cattle over debenture deduction dispute.
esakal
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'चे वातावरण तापले असून दूध उत्पादक संस्था आणि शेतकरी आंदोलकांकडून जनावरे गोकुळच्या कार्यालयात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्यात झटापट झाली. पोलिसांनी जनावरे हटविण्याचा आदेश दिला मात्र आंदोलक ठाम राहिल्याने पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत जनावरे मोर्चातून बाहेर काढली.