हवा प्रदूषण रोखण्यासाठी स्वतंत्र आराखडा

निखिल पंडितराव
रविवार, 1 एप्रिल 2018

कोल्हापूर - शहरातील वाढते हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. हवा ही केवळ शहरापुरती मर्यादित नसल्याने व्यापक गोष्टींचा विचार या आराखड्यात करण्यात येत आहे. आराखडा तयार झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेवर असेल. 

कोल्हापूर - शहरातील वाढते हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. हवा ही केवळ शहरापुरती मर्यादित नसल्याने व्यापक गोष्टींचा विचार या आराखड्यात करण्यात येत आहे. आराखडा तयार झाल्यावर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेवर असेल. 

महापालिकेतर्फे केलेल्या पर्यावरण अहवालात कोल्हापुरात हवेचे प्रदूषण वाढत असून त्याचा माणसांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या निरीक्षणात ही देशातील पहिल्या १८ शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे याचे गांभीर्य ओळखून भविष्यातील उपाययोजनांसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्यातील १७ शहरांमध्ये हवा प्रदूषण रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आराखडा करण्याचे काम सुरू केले, त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेने हा आराखडा तयार करण्यास सुरवात केली. याबाबत एक बैठक नुकतीच झाली. यात प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलिस, पर्यावरणात काम करणारे अभ्यासक अशा विविध जणांचा समावेश आहे. 

हवा प्रदूषण रोखण्यासाठी आराखडा तयार करणारी ‘निरी’ या संस्थेने नागपूर येथे केलेल्या आराखड्याचा नमुना ठेवला आहे. तथापि, शहराचा विचार करता यात भौगोलिक, सामाजिक परिस्थितीनुसार बदल करून काही नवीन मुद्दे समाविष्ट करून आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यानुसार याचे नियोजन सुरू झाले. तीन वर्षांपासून हवेतील बदल आणि त्याचा परिणाम याचा सविस्तर अभ्यास करून भविष्यातील अनेक गोष्टींचा विचार करून हा आराखडा बनविण्यात येईल. वाहने, बांधकाम, श्‍वसन, कचरा, घरगुती गॅस, दगड खाणी अशा विविध मुद्द्यांवर या आराखड्यात मांडणी केली जाईल. यात शहराचा विचार न करता शहराच्या आजुबाजुच्या परिसराचा विचार या आरखड्यात असणार आहे.

आराखड्यात याचा विचार होणार 
 वाहनांपासून होणारे प्रदूषण 
 १५ वर्षांवरील वाहनांची स्थिती
 सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सद्य:स्थिती
 वाहतुकीची शिस्त 
 पार्किंगची व्यवस्था
 शहरातील रस्ते, रुंदीकरण, अडथळे
 डिझेल वाहने, त्यांचे इंधन, त्यातील द्रव्य पदार्थ
 बॅटरीवरील वाहने, इलेक्‍ट्रिक वाहने
 सीएनसीवरील वाहने
 अवजड वाहनांची स्थिती
 रिंगरोड स्थिती
 नैसर्गिक हिरवाईने नटलेला भाग
 वाहतुकीची ठिकाणे
 कारंजे
 खुल्या जागा, झाडांची स्थिती
 अपार्टमेंटमधील निसर्गता
 कचरा टाकण्याची जागा
 कचरा विल्हेवाट पद्धत
 कचरा जाळण्याचे प्रकार
 बेकरी, फरसाण असे उद्योग
 मोठे उद्योग स्थिती
 फटाके, अगरबत्ती, रंगपंचमी, वाढदिवसाचे विविध घटक,
 डासांसाठी उत्पादने वापर व परिणाम

Web Title: kolhapur news air pollution control independent plan