शेतातून यायला उशीर झाल्याने शोधाशोध केली, पण...; पोहताना दम लागल्याने एकाचा मृत्यू

drawn
drawnesakal

पोर्ले तर्फ ठाणे - पोर्ले तर्फे ठाणे (ता पन्हाळा) येथील तानाजी बंडू जाधव (वय ३९ ) यांचा कासारी नदीत पोहायला गेल्यानंतर पोहताना पाण्यात बुडून मृ्त्यू झाला. या घटनेची नोंद पन्हाळा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

drawn
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गायीला 70 तर म्हशीला 80 हजार; शासनाने वाढविली निर्धारित किंमत

घटनास्थळी व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी सकाळी तानाजी जाधव पोर्ले-माजगावच्या दरम्यानच्या कासारी नदीवर पोहायला गेले होते.पोहत असताना त्यांची दमछाक झाली. पोहताना दम लागुन घुटमळल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. (Latest Marathi News)

drawn
Shivsena Case : मुख्य न्यायाधीश बदलले, प्रकरण घटनापीठाकडे! शिंदे-ठाकरे वादात ११ महिन्यात काय घडलं?

शेताकडून यायला उशीर का झाला. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा दुपारी शोध सुरू केला तर कासारी नदी तिरावर त्यांची कपडे व चप्पल आढळून आले. त्यानंतर त्याचा मंगळवारी रात्री उशीरपर्यंत शोध घेतला असता जाधव काही सापडले नाही. बुधवारी पोलीसमित्र उदय निंबाळकर (बावडा), सुरेश उर्फ बळी चेचर, बाबूराव चेचर, राजू रायकर, अभी चेचर, उपसरपंच शहाजी खुडे, सुरेश चेचर व ग्रास्थांच्या मदतीने साहाय्याने त्यांचा मृतदेह शोधून काढण्यात आला. (Breaking Marathi News)

उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्या मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com